सूर्यास्ताचे पूर्वी १५ पळे व नंतर १५ पळे मिळून जी अर्ध घटिका तिला गोधूल (गोरज) लग्न म्हणतात. हा मुहूर्त विवाहाला उक्त अशी पंचागंशुद्धि असेल तर शूद्रादिकांना शुभ होय. सहावा व आठवा चंद्र, पापग्रहाने युक्त लग्न, आठवा मंगळ, गुरुवार व शनिवा, महापात (सिद्धांतशिरोमणीत सांगितला आहे), सूर्यसंक्रांतीचा दिवस हे दोष गोरज मुहूर्त असता वर्ज्य करावे. इतर दोष गोरज मुहूर्ताला ताज्य नाहीत. ब्राह्मणांनी संकट असेल तर अथवा कन्या उपवर झाली असेल तर गोरज मुहूर्त विवाहाला घ्यावा असे क्वचित ग्रंथांमध्ये सांगितले आहे. चंद्र, तारा असावी तशी नसतील तर त्याविषयी दाने - चंद्र अशुभ असल्यास शंखदान, तारा अशुभ असल्यास लवणदान, तिथि अशुभ असेल तर तांदुळाचे दान, कल्याणी असेल तर धान्याचे दान व्यतीपातादि दुष्ट योग अथवा दुष्ट वार असेल तर सुवर्णदान याप्रमाणे दाने करावी. षडवर्गशुद्धि, कालसाधन, कुलिक इत्यादिकांचे स्वरूप वगैरे ज्योतिःशास्त्रविषयक ग्रंथामध्ये पहावी. विस्तारभयास्तव ती येथे सांगितली याप्रमाणे संक्षेपाने मुहूर्ताविषयी विचार सांगितला.