हिरण्यकेशीयांचा स्मार्तहोमप्रयोग
पूर्वी सांगितल्याप्रमाणे संकल्प केल्यानंतर
"यथाहतद्वसव०"
या मंत्राने कुंडाचे भोवती उदक सिंचन करून व दर्भ ठेवून
"अदितेनुमन्यस्व०"
या मंत्राने दक्षिणेकडे पश्चिमेकडून पूर्वेस,
"अनुमतेनुमन्यस्व०"
या मंत्राने पश्चिमेकडे दक्षिणेकडून उत्तरेस,
"सरस्वतेनुमन्यस्व०"
या मंत्राने उत्तरेकडे पश्चिमेकडून पूर्वेस आणि
"देवः सवितुः प्रसुव०"
या मंत्राने ईशानीपासून ईशानीपर्यंत सर्वत्र याप्रमाणे उदक सिंचन (पर्युक्षण) करावे. अमंत्रक समिध देऊन होम वगैरे पूर्वीप्रमाणे करावे.
"अदितेन्वमस्थाः अनुमतेन्व० सरस्वतेन्व० देवः सवितः प्रासावीः०"
या चार मंत्रांनी पूर्वी सांगितल्याप्रमाणे उदक सिंचन (परिषेचन) करावे.
"उदुत्यं० चित्रं देवानां"
या दोन मंत्रांनी प्रातःकाली उपस्थान करावे
"अग्निर्मूर्धादिव०"
आणि "त्वामग्ने पुष्करादधि०"
या दोन मंत्रांनी सायंकाळचे उपस्थान करावे.
आपस्तंबांनी सायंकाळी
"अग्नेयेस्वाहा"
आणि
"अग्नये स्विष्टकृते स्वाहा०"
अशा दोन आहुती द्याव्या. प्रातःकाली
"सूर्याय स्वाहा, अग्नये स्विष्टकृते स्वाहा"
या दोन आहुती द्याव्या. याप्रमाणे विशेष जाणावा. बाकी कर्म हिरण्यकेशीयांप्रमाणे जाणावे.