१. भरद्वाज. २.गर्ग, ३. ऋक्ष आणि ४. कपि
१. भरद्वाज, क्षाम्यायण, देवाश्व इत्यादि एकशेसाठांहून अधिक भरद्वाज आहेत, त्यांचे आंगिरस, बार्हस्पत्य, भारद्वाज असे तीन प्रवर आहेत.
२. गर्ग, सांभरायण, सखीनि इत्यादि पन्नासांहून अधिक गर्ग आहेत त्यांचे आंगिरस, बार्हस्पत्य, भारद्वाज, शैन्य व गार्ग्य असे पाच अथवा आंगिरस, शैन्य, गार्ग्य असे तीन प्रवर आहेत; अथवा अंत्यांचा व्यत्यय करावा; अथवा भारद्वाज, गार्ग्य, शैन्य असे तीन प्रवर आहेत. गर्गाच्या भेदांचे आंगिरस, तैत्तिरि, कापिभुव याप्रमाणे तीन प्रवर आहेत.
३. ऋक्ष, रौक्षायण, कपिल इत्यादि नवांहून अधिक ऋक्ष आहेत. त्यांचे आंगिरस, बार्हस्पत्य, भारद्वाज, वांदन, मातवचस असे पाच अथवा आंगिरस, वादन, मातवचस असे तीन प्रवर आहेत.
४. कपि, स्वस्तितरि, दण्डी इत्यादि पंचविसांहून अधिक कपि आहेत. त्यांचे आंगिरस, आमहय्य, औरुक्षय्य असे तीन प्रवर आहेत. 'आंगिरस, आमहीयव, औरुक्षयस' असा आश्वलायन सूत्रात पाथ आहे.
५. आत्मभू. यांचे आंगिरस, भारद्वाज, बार्हस्पत्य, वर, आत्मभू असे पांच प्रवर आहेत. हा गण क्वचित ग्रंथामध्ये सांगितला आहे. सर्व भरद्वाजांचा परस्परांमध्ये विवाह होत नाही. कारण समान गोत्र आहे व प्रायः दोन अथवा तीन प्रवरांचे साम्य आहे. ऋक्षांमध्ये अंतर्भूत असे जे कपिल त्यांचा विश्वामित्रांशीही विवाह होत नाही. याप्रमाणे भरद्वाजांगिरस सांगितले