प्रातःस्नान केल्यावर मृत्तिकेने (उभा) तिलक करावा. नित्य होम केल्यानंतर भस्माने (आडवा) तिलक करावा. गोपीचंदन, तुलसीमूल, सिंधुतीर, भागीरथीतीर आणि वारुळे या ठिकाणच्या मृत्तिका घ्याव्यात. ललाट, उदर, ह्रदय, कंठ, दक्षिणपार्श्व, दक्षिण बाहु, दक्षिण कर्ण, वामपार्श्व, वामबाहू, वामकर्ण, पृष्ठ, कुकुद (मानेची मागची बाजू) या बारा ठिकाणी शुक्लपक्षामध्ये केशवादि बारा नावांनी आणि मस्तकावर वासुदेव या नामाने तिलक करावा.