विवाहनक्षत्राने युक्त अशा शुभ दिवशी वराचा पिता इत्यादिकांनी कन्येच्या गृही जाऊन
"कन्यापूजनं करिष्ये तदङ्गत्वेन गणपतिपूजनं वरूणपूजनंच करिष्ये"
याप्रमाणे संकल्प करावा. कन्येच्या पित्याने
'करिष्यमाण कन्यादानाङ्गभूतं वाग्दानं करिष्ये तदङ्ग गणपतिपूजनं वरूणपूजनंच करिष्ये"
याप्रमाणे संकल्प करावा. बाकीचा प्रयोग इतर ग्रंथी पाहावा. नंतर विवाह दिवशी अथवा त्याचे पूर्वदिवशी वधूला हळद, तेल इत्यादिकांनी मंगल स्नान करवून त्यातून शेष राहिलेली हळद इत्यादिकाने वराला मंगलस्नान घालावे. याप्रमाणे आचार आहे.