पंचामृत - दूध, दहि, तूप, मध व साखर.
पंचगव्य - गोमूत्र, गोमय, दूध, दहि आणि तूप
पंचखाद्य - खोबरे, खारीक, डाळ, पोहे व लाह्या.
पंचत्वक् - वड, पिंपळ, जांबूळ, आंबा, व पाहीर यांच्या सालीं.
पंचपल्लव - पिंपळ, उंबर, पाहीर, वड, आंबा यांचे टाहाळे.
पंचरत्न - सुवर्ण, रौप्य, मोती, पोवळे, राजावर्त ( हिरा ).
पंचरंग - ( रांगोळी ) - पांढरी, तांबडी, पिंवळी, हिरवी आणि काळी.
सप्तमृत्तिका - गजस्थान, अश्वशाला, चवाठा संगम, वारुळ, डोह व गोठाण यांतील माती
सप्तधान्यें - सातू, गहूं, तीळ, कांग, सावे, चणे आणि साळी.
सर्वौषधि - कोष्ठ, जटामासी, दारुहळद, मोरमासी, शैलेय ( शिलाकुसुम ) चंदन, वेखंड, नागरमोथा, कचोरा व चाफ़्याची साल मिळून दहा.
सौभाग्यवायन - खण, फ़णी, करंडा, मणीमंगळसूत्र, गळेसर, तांदूळ आणि नारळ असे सुपलीत घालून द्यावयाचे.
नवग्रह - रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु, केतू.
समिधा - रुई, पळस, खंर, आघाडा, पिंपळ, उंबर, शमी, दूर्वा, दर्भ.
प्रयोगांत येणार्या कुंड, स्थंडिल, वेदी, यज्ञपात्रें, ग्रहमंडल वगैरे संबंधीं माहिती योग्य ठिकाणीं दिलेली असून त्यांच्या आकृतीही दिल्या आहेत. तसेंच याज्ञिकसाहित्यांत “ पुण्याहवाचन साहित्य, ” “ होमसाहित्य व पूजासाहित्य ” असें जेथें म्हटलें आहे, त्याठिकानीं त्या सदराखालचे सर्व साहित्य घ्यावें. सुपार्या, विड्याची पाने, नारळ खोबर्याच्या वाट्या यांची बेरीज प्रत्येक ठिकाणीं दिली आहे. सर्व साहित्य यथालाभें यथावैभव घ्यावे.