कटिसूत्र बांधणे आणि भूमिवर बसविणे
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
पांचवे महिन्यांत शुभ दिवशीं मृग, हस्त, पुष्य, अश्विनी, ज्येष्ठा, तिन्ही उत्तरा, रोहिणी. या नक्षत्रावर पृथ्वी आणि वराह यांचे पूजन करून मुलास कटिसूत्र बांधून भूमीवर बसवावे.
पांचव्या महिन्यांत शुक्लपक्षी ज्योति:शास्त्रांत सांगितल्याप्रमाणें शुभ तिथि वगैरे असल्यावर पूर्वाण्हकाळीं स्वस्तिवाचन करून वराह अवताराला, पृथ्वीला, गुरूंना, देवांना, आणि ब्राह्मणांना पुजून जमिनीवर शेणानें सारवावें; त्यावर मंडल काढावें; व शंख वाद्य इत्यादि मंगलकारक ध्वनि करवून बालकाला जमिनीवर “ रक्षैनं० ” इत्यादि मंत्रांनी बसवावें. नंतर ब्राह्मणांचें पूजन करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन नीरांजनादि उत्सव करावा. असेंच कन्येचेहि करावें. असा हा उपवेशन विधि संपला.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP