गर्भाधानसंस्कार
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
यजमानानें आचमन करून प्राणायाम करावा. देशकालाचें स्मरण करावें. ह्या माझ्या पत्नीच्या प्रत्येक गर्भामध्यें संस्कारबाहुल्याने हिचेठिकाणीं उत्पन्न होणार्या सर्व गर्भांचें बीजागर्भांपासून उत्पन्न झालेल्या सर्व पापांचें निरसनद्वारानें श्रीपरमेश्वराच्या प्रीतिकरितां गर्भाधान नांवाचें कर्म करतो.
त्याच्या अंगभूत अगोदर गणपतीचें पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन आणि नांदीश्राद्ध करीन असा संकल्प करून व त्याप्रमाणें तीं करावीत. ( नांदीश्राद्धांत ऋतुदक्षसंज्ञक विश्वेदेव घ्यावेत.
प्रजापति देवतेच्या उद्देशानें होम करण्याकरितां स्थंडिल इत्यादि करीन असा संकल्प करून नंतर पृष्ठ३३ प्यारा २ पासून पृष्ठ ३६ प्यारा ५ पर्यंत सांगितल्याप्रमाणें स्थंडिलाचे संस्कार इत्यादि आणि मरुत् नांवाच्या अग्नीचें प्रतिष्ठापनापर्यंत सर्व कर्म करून अग्नीचें ध्यान करावें. नंतर हातांत दोन समिधा घेऊन “ क्रियमाणे० ” येथून “ परिग्रहार्थ० ” येथपर्यंत म्हणून स्थालीपाक पृ. ३७ प्या. ६ “ अन्वाधानंक० ” येथून “ चक्षुषीआज्येन० ” येथपर्यंत म्हणावे. नंतर वर सांगितलेल्या प्रधानदेवतेचा उच्चार करावा तो प्रजापतिदेवतेला चरूने, विष्णुला सहा वेळां तुपानें आणि प्रजापतीला तुपानें याप्रमाणें उच्चार केल्यावर स्थालीपाक पृष्ठ ३७ प्यारा ७ “ शेषेणस्विष्ट० ” येथून पृष्ठ ४७ प्यारा २५ विधूमज्वालाग्नौ० ” येथपर्यंत स्थालीपाकाचें तंत्र करावें. त्यांत विशेष परिसमूहनादि पूर्णपात्रापर्यंतचें सर्व विधान केल्यावर प्रजापतीच्या नावानें निर्वाप व प्रोक्षण करून आज्यभागापर्यंत सर्व करून अवदानधर्मानेम चरु घेण्यापर्यंत करावें. नंतर तो चरु प्रजापतीच्या उद्देशानें अग्नींत टाकावा. हें हवि प्रजापतीचें आहे माझें नाहीं असें म्हणावें.
वरील मंत्रांचा अर्थ -- हे स्त्रिये ! सर्व व्यापक परमेश्वर तुझ्या गर्भाशयाला गर्भ धारण करण्यास समर्थ करो. सर्वोत्पादक परमात्मा गर्भाच्या सर्व आकाराला प्रकाशित करो. प्राणदाताप्रजापति गर्भाला प्राणशक्तीनें परिपूर्ण करो. सर्वाधान विधाता गर्भाला हृष्ट पुष्ट करो १ हे चंद्रशक्ते, हे सरस्वती तुम्ही गर्भाला स्थिर करा. हे प्रिये सुवर्णकमलाच्या माळा धारण करणारे अश्विनी कुमार देव तुझ्या गर्भाचे पोषण करो. २ हे स्त्रिये, अश्विनी कुमार ज्या गर्भाकरितां सुवर्णमय अरणी मंथन करिते झाले. त्या गर्भाला तुझ्या करितां मी दहाव्या महिन्यांत प्रसूतीकरिता बोलवितो. ३ हे नेजमेष ( स्कंदग्रपैकीं एक ) तू गर्भाला पीडा करणारा आहेस म्हणून परत जा. जर तू येणारच असलास तर उत्तम पुत्राला घेऊन ये आणि पुत्राची इच्छा करणार्या ह्या माझ्या स्त्रियेच्या ठिकाणी पुरुष गर्भाला स्थापन कर. ४ जशी ही पृथ्वी उत्तन होऊन स्वर्लोकी सिंचित केलेले वृष्टिरूप रेत ग्रहण करून धान्यरूप गर्भाला धारण करते. हे नेजमेष तसा तूं त्या गर्भाला दहाव्या महिन्यात प्रसूत होण्याकरितां धारण कर. ५ हे नेजमेष विष्णूच्या ( परमात्म्याच्या ) श्रेष्ठ रूपानें युक्त अशा पुरुष पुत्राला ह्या स्त्रियेच्या वीर्याच्या ठिकाणी दहाव्या महिन्यांत प्रसूत होण्याकरितां स्थापन कर. ६ हे प्रजापते तुझ्यावांचून दुसरा कोणीही उत्पन्न झालेला सर्व विश्वांना ग्रहण करण्याला समर्थ झाला नाहीं. म्हणून आम्ही ज्या इच्छेने तुजकरितां हवन करितो, ते आमचे इच्छित पूर्ण होवो. आम्ही धनाचे पति होऊं ७
नंतर “ विष्णुर्योनि० ” “ गर्भंदेहि० ” “ हिरण्ययी० ” “ नेजमेषेति० ” “ यथेयंपृथिवी० ” “ विष्णो:श्रेष्ठेने० ” “ प्रजापति० ” या सात मंत्रांतील प्रत्येक मंत्र म्हणून तूप अग्नींत टाकावें व प्रत्येक मंत्राचे शेवटीं हें हवि माझें नाहीं, असें ह्मणावें. नंतर “ अपन:शोशुच० ” ह्या आठ ऋचांचें सूक्त म्हणून सूक्ताच्या शेवटीं प्राणअंगुलि असलेल्या, खालीं मुख केलेल्या अशा हातानें पत्नीच्या मस्तकाला स्पर्श करावा. “ या:फ़लिनी० ” पृष्ठ ९ ओळ ८ ” ह्या मंत्राचा जप करावा.
“ वधेनदर्स्युं० ” हे ३ मंत्र विश्वानिनो पृष्ठ ४५ ओळ ६ ते ११.३ मंत्र “ आणि अग्निस्तु० हे २ मंत्र, अशा ८ मंत्रांनीं अग्नीची स्तुति करावी.
“ उदीर्ष्व० ” ह्या दोन मंत्रांनीं डाव्या बाजूस बसलेल्या पत्नीच्या उजव्या नाकपुडीत अश्वगंधाचा अथवा दूर्वाचा रस घालावा. तो रस पोटांत उतरल्यावर तिला आचमन करवून तिच्याजवळ जावें. नंतर स्विष्टकृत पृष्ठ ४० प्यारा २८ येथून पृष्ठ ५३ स्थालीपाकतंत्र संपवावें.
नंतर “ सूर्योनोदिव० ” या पांच ऋचांच्या सूक्तांनीं पत्नीसहित सूर्याची स्तुति करावे. ब्राह्मणाला भोजन द्यावे. त्यांचें कल्याणकारक आशीर्वाद घेऊन भोजन करावें. हल्लींचे शिष्टलोक नाकांत रस घातल्याबरोबरच स्विष्टकृत् इत्यादि होमशेष समाप्त करतात. नंतर रात्रौ मंत्रांसह सांगितलेला विधि पुढें लिहिला आहे. ते मंत्र केवळ पठण मात्र करता. असा शिष्टांचा संप्रदाय आहे.
पतीने अभग्न, जंतुवर्जित सुखशय्या असलेल्या, छतानें युक्त अशा मंचकावर आरोहण करून पूर्वी सांगितलेल्या शुभमुहूर्तावर पत्नीसही मंचकावर बसवावें. पत्नीजवळ जाण्याचा असा क्रम आहे कीं, “गंधर्वस्यविश्वावसो० ” ह्या मंत्रानें व विष्णुर्योनी० ” ह्या तीन मंत्रांनीं “ नेजमेषेति० ” ह्या तीन ऋचांनीं तीन अंगुलींनीं उपस्थास स्पर्श करावा, नंतर “ तांपूषन्० ” “ योगर्भ० ” “ अहंगर्भ० ” असे हे तीन मंत्र जपून नंतर एक वेळ स्त्रीबरोबर गमन करावे. त्यानंतर तुझ्या प्राणांत रेत धारण करतों अशा रीतीनें अनुप्राणन करावें. जशी पृथ्वी ही अग्नीनें गर्भवती आहे. जशी द्यौ ही इंद्राच्या योगानें गर्भवती आहे, जसा वायु हा दिशांचा गर्भ आहे, अशा रीतीनें तुला आपलें नांव घेऊन मी गर्भ धारण करवितों, असें बोलून पत्नीच्या हृदयास स्पर्श करून आचमन करावें. ह्या कर्मांत शंभर अथवा दहा ब्राह्मणांस भोजन द्यावें. असा हा गर्भाधान संस्कार झाला.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP