मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
ग्रहयज्ञसंकल्प

ग्रहयज्ञसंकल्प

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


कर्त्या यजमानानें नित्यकर्म केल्यावर आचमन करून पवित्र धारण करावें. प्राणायाम करून देव गुरु ब्राह्मणास नमस्कार करून देशकालाचा उच्चार करून मी ( अमुक ) कर्म करण्याकरिता प्रथम ग्रहांची अनुकूलता प्राप्त व्हावी किंवा माझी ( अमुक ) इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी परमेश्वराची प्रीति होण्याकरिता ग्रहयज्ञ करितो असा संकल्प करावा. नंतर गणपति पूजन, पुण्यगवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध व आचार्यवरण करून ग्रहांच्या प्रतिमेची अग्न्युत्तारणपूर्वक प्राणप्रतिष्ठा करावी.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP