मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
वर्धापनाचा ( वाढदिवसाचा ) निर्णय

वर्धापनाचा ( वाढदिवसाचा ) निर्णय

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


ज्या दिवशीं जन्म झाला त्या दिवसाला वाढदिवस असें म्हणतात. वाढदिवसाचा विधि करणें तो वर्षपर्यंत दरएक मासी जन्मतिथिचे दिवशीं करावा. वर्षानंतर दरएक वर्षी जन्मतिथीचे दिवशीं करावा. जन्मतिथी दोन दिवस असेल तर ज्या दिवशीं जन्मनक्षत्राचा योग असेल ती घ्यावी. दोन दिवस जन्मनक्षत्राचा योग असेंल किंवा दोनहि दिवशी नसेल तर सूर्योदयकाल व्यापिनी अशी चार घटिकाहून अधिक असेल ती घ्यावी. चार घटिकांहून कमी असल्यास पूर्व दिवसांची घ्यावी. जन्ममास अधिकमास आला असतां शुद्धमासात दरएक वर्षाचा वर्धापनविधि करावा; अधिकमासांत करूं नये.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP