श्रेयसंपादन
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
आचार्यानें वरणक्रमानें यजमानाकडून श्रेय संपादन करवावें. यजमानानें आचार्याकडून अमुक कर्मांचें श्रेय घेतो असा संकल्प करावा. आचार्यानें यजमानाच्या हातावर " शिवाआप:संतु " म्हणून पाणी घालावें, " सौमनस्य० " म्हणून पुष्प व " अक्षतं० " म्हणून अक्षत आणि " दर्घिमायु: " म्हणून पुन: पाणी घालावें आणि तुमच्या आज्ञेनें ह्या अमुक कर्मामध्यें जें कांहीं जप होम वगैरे कार्य केले आहे, त्या पासून झालेले श्रेय तुम्हास मी देत आहे; त्या श्रेय घेण्यानें आपण श्रेयस्वी व्हा म्हणजे आपले कल्याण होवो. असा आशिर्वाद दिल्यावर यजमानानें तसे असो म्हणून बोलावें. याप्रमाणेच आणखी ऋत्विज वगैरे जे ब्राह्मण असतील त्यांचेकडून श्रेय घ्यावे.
सर्व ब्राह्मणांना यथाशक्ति दक्षिणा द्यावी. " यांतुदेवा० " हा श्लोक म्हणून ग्रहांचे विसर्जन करावें. " गच्छगच्छ० " हा श्लोक म्हणून अग्नीचें विसर्जन करावें. ग्रहपीठ सर्व सामानासहित आचार्यास द्यावें. यजमानानें पत्नीसहित " रूपंरूपं० " म्हणून तुपांत मुख पाहून दक्षिणेसहित ते तूप ब्राह्मणास द्यावे. नंतर नवग्रहांच्या उद्देशाने यथाशक्ति ब्राह्मणभोजन करावे. त्यांत विशेष ग्रहयज्ञावश्यकता पृ. ५६ शेवटच्या प्यार्यांत सांगितलेल्याप्रमाणें करावें. नंतर त्यांचेकडून आशीर्वाद घेऊन कर्म ईश्वरार्पण करावें. याप्रमाणें मात्स्यानुसारी ग्रहयज्ञ प्रयोग संपूर्ण झाला.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP