सीमंतोन्नयनाचा संस्कार
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
पूर्वेस तोंड करून बसलेल्या पत्नीच्या हस्तास स्पर्श करून पतीनें तुपाच्या आहुति “ धाताददातु० ” “ धाताप्रजाना० ” “ राकामहं० ” “ यास्तेराके० ” “ नेजमेष० ” “ यथेयंपृथिवी० ” “ ॥ विष्णो:श्रेष्ठेन० ” “ प्रजापते० ” ह्या मंत्रांनीं, ८ आहुति स्रुवानें द्याव्यात.
नंतर पत्नीच्या पश्चिमेस पूर्वेस तोंड करून उभे राहून पतींनें अपरिपक्व फ़लांनीं युक्त*उंबराचे दोन स्तबक ( घोंस ). त्रिशुक्लशललीं ( सायाळाचा कांटा तीन ठिकाणी पांढरा असा ) वेणीप्रमाणें वळलेले दर्भांचे तीन अंकूर, हें सर्व हातांत घेऊन त्यांच्या मूळानें पत्नीच्या केश आणि मस्तक ह्यांच्या संधी म्हणजे भांगापासून मस्तकापर्यंत “ ॐ भूर्भव:स्व: ” ह्या मंत्रानें तीन वेळां अथवा चार वेळां केश विंचरून स्वच्छ करावें व वेणी बांधावी. नंतर जसा आचार असेल तसा गोघूम ( वनस्पति ) सहित उंबरांची माळा तिच्या गळ्यांत घालून वीण घेऊन वीणा घेऊन गायन करणार्या दोन ब्राह्मणांनी सोमराजाचें गायन करावें. “ सोमोराजा० ” हा मंत्र म्हणावा. त्यावेळीं “ असौ ” ह्याचेबद्दल गंगा इत्यादि जवळ असलेल्या नदीचें संबोधन विभक्तीनें नाम बोलून त्या ब्राह्मणांनी गायन करावें. सामवेदाचा गायन प्रकार माहीत नसल्यास तो मंत्र नुसता तीन वेळां पठण करावा. गाणारे जर ब्राह्मण नसतील तर नलादि राजास उद्देशून गावें.
नंतर स्विष्टकृत् इत्यादि होम ( पृष्ठ ४९ प्यारा २८ पासून पृष्ठ ५३ पर्यंत सर्व स्थालीपाकतंत्र समाप्त ) करून ब्राह्मणाला ऋषभ ( बैल ) आणि दक्षिणा द्यावी. ब्राह्मण नसेल तर दुसर्या विद्वान् ब्राह्मणाला ऋषभ आणि दक्षिणा द्यावी. पतिपुत्र असलेल्या वृद्ध सुवासिनींनीं सांगितलेला मंगलाचार करावा. प्रत्येक संस्काराबद्दल दहा दहा ब्राह्मणांस अथवा तीन तीन ब्राह्मणांस भोजन द्यावे. शक्ति असल्यास शंभर ब्राह्मणांस भोजन द्यावें. असा सीमंतोन्नयन संस्कार संपला.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP