जातकर्म संस्कार
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
पुत्र झाल्याबरोबर बापानें त्याचें तोंड पाहून नदी इत्यादिकांवर जाऊन उत्तरेस तोंड करून स्नान करावें; आचमन करून शुभ्र चंदन, पुष्पमाला इत्यादिकांनी अलंकृत व्हावें आणि नालच्छेदन करण्याचे पूर्वीं सुईण इत्यादिकांशिवाय दुसर्या कोणाकडून स्पर्श न केलेला असा, मातेचा स्तनपान न केलेला, स्नान घातलेला असा पुत्र मातेचें मांदीवर पूर्वेस तोंड करून ठेवावा, देशकालाचें स्मरण करून माझ्या हया पुत्राला गर्भातील पाणे पिण्यापासून झालेल्या संपूर्ण दोषाचें निरसन आणि आयुष्य व मेधा हयांची अभिवृद्धि, बीज गर्भापासून झालेल्या दोषांचा नाश इत्यादिकांच्या द्वारानें श्रीपरमेश्वराच्या प्रीतीकरितां जातकर्म संस्कार करीन, तदंग गणपतिपूजनपूर्वक स्व्स्तिपुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध करीन असा संकल्प करून ( पृष्ठ ४ ते २२ ) तशीं तीं सर्व करावींत.
नंतर मध आणि दूप ह्यांचे विषम भागानें मिश्रण करून तें मिश्रण दगडावर ठेवून त्यावर सोनें त्याचा अंश आंत येईतोंपर्यंत घासावें. तें सर्व रुप्याच्या अथवा कांस्य इत्यादिकांच्या पात्रांत ठेवावें आणि “ प्रतेददा० ”
ह्या मंत्रानें त्याच सोन्यानें तें मध व तूप पुत्रास पाजावे. तें सोनें धुवून कुमाराच्या उजव्या कानांत घालावें. त्या पुत्राचें तोंडाजवळ आपलें तोंड नेऊन “ मेघांते० ” हा मंत्र जपावा. पुन: तेंच सोनें डाव्या कानावर ठेऊन हाच मंत्र जपावा.
नंतर “ अश्माभव० ” ह्या मंत्रानें पुत्राच्या दोन्ही खांद्याला एकदम स्पर्श करावा. “ इंद्रश्रेष्ठानि० ( पृष्ठ ६७ ) ” “ अस्मेप्रयंधि० ” हे मंत्र म्हणून, अशा रीतीनें हे तीन मंत्र म्हटल्यावर पुत्राच्या खांद्यास स्पर्श करावा.
नंतर रक्षण आणि आयुष्य ह्यांच्या अभिवृद्धिकरितां “ अंगादंगा० ” हा मंत्र बोलून पुत्राच्या मस्तकास तीन वेळा हुंगावें. नंतर शिशूचें जें नांव पुढें ठेवावयाचें असेल तें नांव त्या वेळेसच स्मरावें. मातेचा उजवा स्तन धुवून “ इमांकुमारो० ” हा मंत्र बोलून मातेनें शिशूकडून स्तनपान करवावें. ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी आणि त्यांपासून आशीर्वाद घ्यावा.
होम करावा ह्यापक्षीं प्रबल नांवाच्या अग्नीची स्थापना करावी. जातकर्म होमामध्यें देवतापरिग्रहाकरिता “ चक्षुषीआज्येन ” येथपर्यंतचें सर्व कर्म करावें. अग्नि, इंद्र, प्रजापति, विश्वेदेव, ब्रह्मा इतक्यांना तुपानें; बाकीं उरलेल्या स्विष्टकृत् इत्यादि “ सद्योयक्ष्ये ” असें बोलून स्थालीपाक तंत्र पृष्ठ ३३ ते ४६ प्यारा २२ पर्यंत करून वर सांगितलेल्या देवतांना तुपाच्या आहुति द्याव्या. नंतर मध, तूप ह्यांचें पान इत्यादि करून स्थालीपाक तंत्र पृष्ठ ४९ प्यारा २८ येथून सर्व संपवून स्तन द्यावें.
“ तमर्वंत० ” ह्या ५ मंत्रांनीं आशीर्वाद द्यावा. असा जातकर्मसंस्कार संपला.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP