मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
वर्धापन ( वाढदिवसाचा ) संस्कार

वर्धापन ( वाढदिवसाचा ) संस्कार

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


यजमानानें आचमन करून प्राणायाम करावा; आणि देशकालाचें स्मरण करून माझ्या बालकाचें वर्ष पूर्ण झालेल्याचा आज जन्मदिवस आहे. त्या दिवशीं आयुष्याची अभिवृद्धिद्वारानें परमेश्वराची प्रीति होण्याकरिता दूर्वाहोम करीन असा संकल्प करून यथाविधिप्रमाणें बलवर्धन नामक अग्नीची स्थापना करून पुन: देशकालाचें संकीर्तन करून दोन समिधा घेऊन ह्या दूर्वाहोमामध्यें देवता परिग्रह इत्यादि चक्षुषीआज्येनपर्यंत सर्व बोलून प्रधानदेवता मृत्युंजयाचा एकशेआठ दूर्वाद्रव्यानें शेषानें स्विष्टकृत् इत्यादि आज्यभागांत कर्म करून दधि मध आणि तूप ह्यांनीं युक्त अथवा नुसत्या तुपानें युक्त तीन तीन दूर्वा घ्याव्यात; आणि “ त्र्यंबक० ” हा मंत्र म्हणून त्याच्या एकशेआठ आहुति अग्नींत द्याव्यात. स्विष्टकृदादि होमाचा शेष समाप्त करावा. त्यानंतर विधिप्रमाणें ग्रहयज्ञ करावा. आयुष्याकरितां चरुहोमाचा संकल्प कराव्वा. तेथें असा क्रम आहे कीं, देश आणि काल ह्यांचें संकीर्तन करून आयुष्याच्या अभिवृद्धिद्वारानें श्रीपरमेश्वराची प्रीति होण्याकरितां आयुष्य चरूहोम करीन असा संकल्प करून स्थालीपाक पृष्ठ३३ पासून पृष्ठ ४६ प्यारा २३ “ समप्रदेशेहुत्वा ” येथपर्यंत करावा. त्यांत विशेष स्थंडिलावर वर्धमान नामक अग्नीची स्थापना करावी. आयुष्य चरुहोमामध्यें देवतापरिग्रहाकरितां इत्यादि चक्षुषीआज्येन हा सर्व प्रकार बोलून विश्वेदेवांना दहा वेळां अग्नीला सोळा वेळां, जातवेदस अग्नीला एक वेळ चरुहोमानें होमून शेषानें आज्य, भागांत करावें.
नंतर “ आनोभद्रा० ” ह्या १० मंत्रांनीं १० चरूच्या आहुति द्याव्यात; प्रत्येक मंत्रास आरंभी ‘ ॐ ’ व शेवटीं ‘ स्वाहा ’ म्हणून द्याव्यांत. नंतर “ इमंस्तोमं० ” ह्या १६ मंत्रांनीं चरूच्या १६ आहुती द्याव्यात. “ जातवेदसे० ” पृष्ठ ६८ या मंत्रानें एक आहुति द्यावी. याप्रमाणें सर्व मिळून २७ मंत्रांनीं २७ आहुति स्थालीपाकांत सांगितलेल्या अवदानधर्मानें द्याव्यात. स्विष्टकृत् इत्यादि होम समाप्त करावा; म्हणजे स्थालिपाक पृष्ठ ४९ प्यारा २८ पासून पृष्ठ५३ पर्यंत करावा.
नंतर वासुदेवाला, नक्षत्राच्या देवतेला, चंद्राला, स्वनक्षत्राला आणि वरुणाला षोडश उपचारांनीं पूजा करून त्या त्या देवतेचे प्रकारक जे मंत्र असतील त्यांनीं योगानें यथाशक्ति होम करावा. ग्रहयज्ञांत सांगितलेल्या विधीनें अभिषेक केल्यावर आपल्याशक्त्यानुसार गाय, भूमि. सोनें इत्यादिकांचें दान करावें, देव, गुरु, ब्राह्मण, मित्र, बंधुजन ह्यांची पूजा करावी. आपली वाहनें, आयुधें, आसनें छत्र ह्यांची पूजा कराई. यथाविधीप्रमाणेम नांदीश्राद्ध करावें आणि ब्राह्मणांना भोजन द्यावें. शुभमुहूर्तावर गंध इत्यादिकांनीं अलंकृत करून दागिने, पुष्पांची माळा धारनपूर्वक सोन्याचा कटदोरा घालून नवीन वस्त्र धारण करावें. पति आणि पुत्र असणार्‍या सुवासिनी स्त्रियांनीं नीरांजन केलेला असा होत्साता ब्राह्मणांकडून आशीर्वाद घ्यावा. स्वत: हविष्य अन्न खाऊन जितेंद्रिय असें रहावें. हा सर्व प्रकार बालक अवस्था असेल तोंपर्यंत पिता इत्यादि वडिल माणसांनी करावा. मोठ्या वयांत आल्यावर आपलें आपण स्वत:च पूर्वी सांगितल्याप्रमाणें करावें. अशा रीतीनें हा वर्षपूर्तीचा म्हणजे वाढदिवसाचा संस्कार संपला.
दुसर्‍या ग्रंथामध्यें पहिल्या वर्षी प्रत्येक महिन्यास हा संस्कार करावा आणि मग प्रत्येक वर्षास मंगलकारक स्नान करून कुमुद इत्यादि देवतांचें पूजन करून शक्त्यनुसार ब्राह्मणांस भोजन देऊन त्यांना दक्षिणा द्यावी. सुवासिनीकडून ओवाळून घ्यावें. नंतर नूतन वस्त्र धारण करावे. ब्राह्मणांना आणि लहान बालकांना तुपांत तळलेल्या पुर्‍या तुपासह कुमुद इत्यादि देवतांच्या प्रीतिकरितां आणि आयुष्याची वृद्धि व्हावी ह्यास्तव वायनरूपानें द्याव्यात; आणि जन्मनक्षत्राचे देवतेच्या प्रसन्नतेकरितां वायनें द्यावींत. वर्षाचे शेवटीं मजबूत बारा बांबूंच्या पेट्या करून त्यांमध्यें लाडू इत्यादि भक्ष्यपदार्थ ठेवून नवीन वस्त्रांनीं आच्छादित करून त्या पेट्या पति व पुत्र असलेल्या सुवासिनींना द्याव्यात आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. हा सर्व प्रकार जीवंतपणीं आईनेंच आपल्या पुत्राच्या आयुष्याकरितां करावा. दुसर्‍या ग्रंथामध्यें गणेश,नवग्रह, इष्टदेवता आणि मार्कंडेय ह्यांची पूजा करून त्यांची प्रार्थना करावी. ती अशी कीं, हे मुने, जसे तुम्ही जिरंजीवीं आहां तसा मीही होईन; आणि मी रूपवान् धनवान् आणि लक्ष्मीयुक्त असा नेहमी होईन. सात कल्पपर्यंत जीवंत राहणार्‍या हे मार्कंडेय ऋषी तुम्हीं माझ्यावर प्रसन्न व्हा आणि आमचें आयुष्य आणि आरोग्य ह्यांची सिद्धि करा. हे मुनीमध्यें श्रेष्ठा. जसे आपण चिरंजीवी आहां तसेंच मलाही चिरंजीवी करा. हे महाभाग मार्कंडेय ऋषी. आपण सात कल्पपर्यंत जीवंत राहिलेले आहा म्हणून माझें आयुष्य आणि आरोग्य ह्यांच्या सिद्धीकरितां वरदान देणारे व्हा नंतर तिलांसह गुडयुक्त अर्धे ओंजळी इतकें दूध घेऊन हें दूध मार्कंडेयापासून वर मिळवून आयुष्यवृद्धीकरितां पितों असें म्हणून तिलगुडयुक्त दूध प्यावें. अश्वत्थामा, बलि, व्यास, हनूमान, बिभीषण, कृपाचार्य परशुराम हे सात चिरंजीवी आहेत. ह्या सातांचें स्मरण तसाच आठवा मार्कंडेय ह्यांचें स्मरण जो नित्य करतो तो संपूर्ण शंभर वर्षें रोगपीडारहित असा वांचतो. ह्या वचनावरून अश्वत्थामादि सात आणि मार्कंडेय धरून आठ ह्यांचें स्मरण करावें. असा हा वर्धापनसंस्कार संपला.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP