ब्रह्मचारी यानें दोन आचमन प्राणायाम करून देशकालाचा उच्चार करावा. नंतर माझ्या शौच, आचमन, “ संध्यावंदन, पवित्रधारण, भिक्षा, अग्निकार्य, शूद्रादिकांच स्पर्श, “ कौपिन, कटिसूत्र, यज्ञोपवीत, मेखला, दंड, अजिन यांचा त्याग, ” दिवसा झोप घेणें, छत्री, जोडा, माला धारण करणें, उटी, काजळ यांचें लेपन, जलक्रीडा, नृत्य. गीत, वाद्य, पाखंडादिकांशी संभाषण, शिळें अन्न खाणें वगैरे ब्रह्मचारीव्रताच्या लोपापासून होणार्या दोषांचें निवारण होण्याकरितां आज्यहोमपूर्वक तीन कृच्छ्रें अमुक प्रत्याम्नायानें मी आचरण करितों, अथवा शौचाचमनादि सर्व ब्रह्मचर्यनियमव्रत लोपाबद्दल प्रायश्चित्तद्वारानें श्रीपरमेश्वराची प्रीति होण्याकरितां होमपूर्वक तीन कृच्छ्रे आचरण करितो, असा संकल्प करून, स्थालीपाकतंत्र पृष्ठ ३३ प्यारा २ पासून “ समिद्द्वयमादाय ” येथपर्यंत पृष्ठ३७ प्यारा ६ “ अस्मिन्नन्वा० ” येथून “ आज्येन ” येथपर्यंत म्हणावें. नंतर “ अत्रप्रधानं० ” येथून “ एकैकयाज्याहुत्या ” येथपर्यंत म्हणावें. नंतर स्थालीपाक पृष्ठ ३७ प्यारा ७ “ शेषेणस्विष्ट० ” येथून पृष्ठ ४६ प्यारा २३ “ समप्रदेशेहुत्वा ” येथपर्यंत करावा. नंतर पृष्ठ १६५ ओळ ६ पासून ओळ १५ पर्यंत संस्कारलोपनिमित्तकहोमाच्या क्रमानें प्रायश्चितार्थ “ प्रजापतयइदं० ” येथपर्यंत प्रत्येक मंत्रानें एक तुपाची आहुति या प्रमाणें १५ तुपाच्या आहुति द्याव्या. नंतर कृच्छ्राच्या प्रत्याम्नायाबद्दल तीन कृच्छ्र गाईची किंमत, सहस्रतिलाहुति अथवा दहा हजार गायत्रीजप यांतून एक करून, स्थालीपाक पृष्ठ ४९ प्यार २८ पासून पृष्ठ ५३ प्यारा ३२ पर्यंत संपवावा.
एक किंवा अनेक व्रतांचा लोप झाला असतां साधारण प्रायश्चित ऋग्विधानांत सांगितले आहे :- ब्रह्मचारी यानें स्वधर्माचें आचरणांत कांहीं न्यूनपणा आला असतां चैत्रमासी शिवालयांत “ तंवोधिया० ” या मंत्राचा एक लक्ष जप करावा.
महानाम्नी व्रत इत्यादिकांचे लोपाविषयीं प्रत्येकव्रताच्या लोपाबद्दल एकशेआठ अथवा अठ्ठावीस किंवा आठ आहुति गायत्रीमंत्रानें आज्याचें ( घृताचें ) हवन करून, एकैक कृच्छ्र, प्रायश्चित्त करून, गुरूला दक्षिणा देऊन त्यांचे आज्ञेने समावर्तन संस्कार करावा. असा हा ब्रह्मचारीव्रतलोप प्रायश्चित्ताचा प्रयोग झाला.