संस्काराची परिभाषा
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
कोणतेही कर्म करण्याचे पूर्वी स्नान करून शेंडीला गांठ मारावी; तिलक धारण करावा. यज्ञोपवीती करावी आणि दोनवेळा आचमन करून पवित्र धारण करावें. १ कर्म करितेवेळी धौतवस्त्रें असावी. कर्म करणे ते श्रद्धेनें करावें. लक्ष्य कर्माकडेच ठेवावे; यथाशक्ति अलंकार धारण करावे; कर्माशिवाय दुसरे भाषण करू नये, कर्म करण्याचे ठिकाणी दांभिकपणा नसावा आणि मत्सर द्वेष इत्यादिकांपासूनही अंत:करण अलिप्त ठेवावे. २ अपत्कालामध्यें सुद्धां शुद्ध असतानाच कर्मानुष्ठान करीत जावे. जपहोम इत्यादि कर्में करितेवेळी विनाकारण दुसर्या मनुष्याला स्पर्श करूं नये. ३ न समजून जर कोणाचा स्पर्श झाल्यास उदकस्पर्श करावा; परंतु समजून उमजून स्पर्श केल्यास तीन प्राणायाम करावे. ४ जाते, उखळ, पाटा, इत्यादिकांचा शद्ब होत असताना कर्म करूं नये. त्याचप्रमाणें सूर्योदयकालीन व सूर्यास्तकालीन संधि असतानाही कर्म करू नये. ५
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP