गर्भिणी पतीचे धर्म
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
गर्भिणी स्त्रीची इच्छा या पदार्थांवर होईल तो तिला यथायोग्य द्यावा; तेणेंकरून ती चिरायु पुत्र प्रसवते. दौहृद ( द्विहृदया दोन हृदयवती ) गर्भवती स्त्रियेला इच्छित पदार्थ न दिल्यास ( डोहाळे न पुरविल्यास ) कुबडा, लंगडा, विक्षिप्त मूर्ख, मुका, अंधळा बालक, उत्पन्न होईल किंवा मरेल म्हणून तिला प्रिय असेल ते करावें, समुद्रस्नान, वृक्ष तोडणें, क्षौर, प्रेत वाहणें, परदेश प्रयाण ही गर्भिणीपतीनें वर्ज्य करावी. क्षौर, मैथुन तीर्थयात्रा, श्राद्धभोजन आणि नौकेत बसणें इतकीं वर्ज्य करावीं. युद्ध, घर बांधणें, नखें केश यांचा छेद; चौल प्रताबरोबर जाणे, विवाह ही सातव्या महिन्यापासून वर्ज्य करावीं. क्षौर पिंडदान, प्रेताची क्रिया, पिता जिवंत आहे त्यानें व गर्भिणी पतीनें करूं नयेत.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP