प्रथम केशकर्तन ( जावळ ) निर्णय
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
बालकाचे डोक्यावरील केसाचे जावळ ( केस कातरणें ) मोठ्या सावधानपणे काढून डोक्यास मलई लावली अस्तां डोक्याचें त्वचेचें रोग दूर होतात. केसाला चाई लागत नाही. डोक्यातील सर्व भागाला रक्त पोहोचून नवीन केस येतात ते पुष्ट होऊन त्याचे बूड मजबूत होतात. केश, नख, रोम हे काढल्यापासून सर्व विकार दूर होऊन हर्ष, हलकेपणा व सुख प्राप्त होऊन उत्साह वाटतो. पुष्टि, आयुष्य व पवित्रता याची वृद्धि होते. मुलाचे जावळ जन्मदिवसापासून सम ( २ - ४ इत्यादि ) मासांत काढावे. मुलीचे ( १ - ३ - ५ ) इत्यादि विषम महिन्यांत काढावे. उत्तरायनामध्यें तसेंच पुनर्वसु, पुष्य, अश्विनी, मृग, श्रवण, धनिष्ठा, शततारका हस्त, चित्रा, स्वाति या नक्षत्रावर शुभ ग्रहांच्यावारी, पूर्णातिथि यांचे ठायीं दोन प्रहरच्या आत काढावे. पूर्णा आणि जया तिथीमध्यें अमावस्या आणि अष्टमी ह्या तिथि वर्ज कराव्या.
( मुलीचे जावळ काढण्याचा संप्रदाय कर्नाटक प्रांतात आहे. )
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP