समावर्तन ( सोडमुंज ) संस्काराचा निर्णय
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
वेदांचें अध्ययन पूर्ण झाल्यानंतर गुरूची आज्ञा घेऊन स्नान करावें, स्नान म्हणजे समावर्तन करावें. ( सम् = पूर्ण, उत्तम आवर्तन = निवृत्त होणे अर्थात् समाप्त करणें. ) ब्रह्मचारी यानें यथोक्त विद्याभ्यास यथावत् काल संपूर्ण केल्यानंतर गुरूंच्या व मातापित्रादि वडिलांच्या संमतीनें व अनुमोदनानें गृहस्थाश्रम स्वीकारण्यासाठीं स्वानुरुप वधूची योजना केल्यानंतर सामवर्तनसंस्कार करावा लागतो. सध्या स्थिति पालटली आहे, वेदाध्यायनाचा मागमूसही राहिला नाहीं. विद्यार्थी सोळा दिवस रहूद्या पण सोळा तासहि व्रतस्थ रहात नाहीं. उपनयनानंतर ब्रह्मचर्याचे कोणतेही नियम न पाळले तरी त्या नियमांच्या समाप्ती दाखल असणारा हा संस्कार करण्यांत येतो. गृहस्थाश्रमासारख्या सर्वलोकोपकारक आश्रमाचे महत्व मनावर ठसावे व आश्रमाच्या कर्तव्यांत आपल्या हातून कुचराई होऊं नये म्हणून या संस्काराचे महत्त्व फ़ार आहे. समावर्तन ( सोडमुंज ) मौंजीबंधनास सांगितलेल्या मुहूर्तावरच करावें, असें जरी आहे तरी मार्गशीर्षमासी विवाह होत असतां दक्षिणायनांत देखील सोडमुंज करावी. कारण मनुष्यानें आश्रमावाचून एक दिवस देखील राहूं नये, असा दक्षस्मृतींत निषेध सांगितला आहे म्हणून शुभदिवशीं समावर्तन करावें ब्रह्मचर्यदशेमध्यें दशाहाशौच धरण्यास कारण असा सपिंडांतील कोणी मृत असल्यास सोडमुंज केल्यानंतर त्रिरात्रींत विवाह करूं नये. कोणी मृत झाला नसल्यास हरकत नाहीं.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP