उपाध्यायानें ( पंडित ) संतति प्राप्त्यर्थ विधान ( पुत्रेष्टि कर्म ) करावें १
उत्तम संततीला ( कुलाला ) प्रकाशित करणार्या दीपज्योति स्त्रियाच होत. गृहाची शोभा स्त्रियाच असल्यामुळें स्त्री ही लक्ष्मीस्वरूप आहे. म्हणून श्री व स्त्री ह्यांत मुळींच भेद नाहीं २ ज्या घरांत स्त्रियांचा बहुमान व सत्कार केला जातो. त्या घरांत देवतुल्य संतति होते. ज्या घरांत स्त्रियांचा अपमान व धिक्कार केला जातो. तेथें अर्थातच धर्मनीति शून्य, कुलाचा नाश करणारी संतति होते ३ ज्या कुलांत पति व पत्नी ही उभयता एक मेकामुळें नेहमी संतुष्ट व प्रसन्न असतात त्या कुलाचे निश्चये करून शाश्वत कल्याण होते. ४ पत्नी असंतुष्ट असेल तर ती पतीला आनंद देऊं शकत नाहीं. व आनंदरहित उदासीन पती सुप्रजोत्पादनास समर्थ होऊं शकत नाहीं. ५
संतति उत्तम निपजावी अशी काळजी प्रत्येक जोडप्यानें अंत:करणापासून घेतली पाहिजे. अनाचार किंवा दुराचार ज्याचा त्याला भोवून राहतो असे नाहीं; तर तो त्याच्या संततीला व पुढील सात पिढ्यांना सुद्धां भोवतो. ६
आहार. आचार, विचार व चेष्टा इत्यादिकांनी युक्त होऊन ज्या भावनेने स्त्रीपुरुष संबंध करतील, तशीच संतति त्यांना निश्चयेकरून प्राप्त होईल ७
उत्तमसंतति होणे हे पतिपत्नीच्या आहारावर अवलंबून आहे, तस्मात् आरोग्य, पुष्टि, बळ, सुबुद्धि इत्यादिकांची वृद्धि करणारें सर्वोषधीचें संततिजनक विधान ( पुत्रेष्टि कर्म ) करावे. पुत्रेष्टि केल्यानंतर अपराण्हकाळीं एक महिनाभर पुरुषानें ब्रह्मचारी राहून शरीरास सुवासिक घृत मर्दन करून आणि घृत व दूध मिश्रित भात सेवन करावा. तसेंच स्त्रीनेही ब्रह्मचारिणी राहून शरीरास तिलतैल मर्दन करून तेल व उडीदयुक्त भोजन करावें. नंतर आपली स्त्री रजस्वला झाल्यावर उक्त ४ - ६ - ८ - १० - १२ ह्यांतून शुभदिवशींच्या रात्री स्त्रीला प्रेमानें व सुभाषणानें संतुष्ट करून पुत्राच्या इच्छेने ऋतुदान करावे.
सर्वोंशधियुक्त घृतानें पुत्रेष्टि करण्याचा विधि --
आंबेहळद ( २ भाग ), हळद, चंदन, मुरा ( मोरमासी ) कुष्ठ ( कोष्ठ कोळंजन ), जटामासी, मोरवेल शिलाजित मुस्ता ( कचूर ) भदमोथ ( नागरमोथा ) कापुर, ( ११ ) यांत आंबेहळद १० मासे व उंबराच्या काष्ठाच्या मंथनीनें ( रवीनें ) मंथन करून ( घुसळून ) त्यांतून लोणी काढावें. त्याचे घृत ( तूप ) तयार करून त्या घृतांत केसर, कस्तुरी, जायफ़ळ, विलायची, जायपत्री, अशीं सुगंधी द्रव्यें किंचित् मिळवावी.
ही सुगंधीद्रव्यें घृताच्या मानानें मिश्रित करावी, तीं अशी - १ शेर घृतात कस्तुरी १ रत्ती व बाकीची सुगंधी द्रव्यें प्रत्येकीं १ मासा घालावीं. १ छटाक घृतास कस्तुरी १ रत्तीचा १६ वा भाग, व केशर वगैरे प्रत्येकी अधीं रत्ती घालावे.
नंतर त्या सर्वौषधि व सुगंधिद्रव्ययुक्त घृतांतून दरदिवस प्राप्त:काळीं घृत घेऊन उभयतांनीं नित्य होम करावा हा होम स्थालीपाक तंत्रानें ( पृष्ठ ३३ प्यारा १ ते १२ व पृष्ठ ४३ प्यारा १६ ते २३ ) करून आधार व आज्यभाग यांच्या आहुति दिल्यानंतर गर्भाधान संस्कार प्रयोगांतील ‘ विष्णुर्योनि ’ इत्यादि सात मंत्रांनीं वरील घृताच्या ७ आहुति देऊन स्थालीपाक तंत्र ( पृष्ठ ४९ प्यारा २८ ते ३३ ) पूर्ण करावें या होमास ( पुत्रेष्टि ) म्हणतात.
नंतर दुधांत उत्तम तांदुळ शिजवून क्षीर करून त्यांत पूर्वोक्त ( यज्ञशेष ) घृत मिळवून ती घृतयुक्त क्षीर, किंवा तो घृतयुक्त भात उभयतांनीं भक्षण करावा. तेणेंकरून सुशील, विद्वान, दीर्घायुषी, सतेज, सदृढ, निरोगी असा पुत्र उत्पन्न होतो. आणि त्याच प्रमाणें तांदूळ व तीळ एकत्र करून तशांच उत्तम गुणांची कन्या प्राप्त होते.
तात्पर्य अशा प्रकारचे योग्य पदार्थ गर्भधारण करणार्या स्त्रीनें व तिच्या पतीनें सेवन केल्यानें त्यांची संतति शारिरिक व मानसिक शक्तीनें सदृढ होऊन दीर्घायुषी होते. पूर्वोक्त घृतयुक्त पदार्थ भक्षण करण्याचा सामान्य नियम असा आहे कीं, ऋतुदान करण्याचा शुभ दिवस शुक्रपक्षांतील घेऊन तत्पूर्वी १२ दिवस व्रतस्थ रहावे; अर्थात् वर लिहिल्याप्रमाणे घृतयुक्त भोजन करून मिताहारी राहून ब्रह्मचर्य व्रत धारण करावें व नंतर ऋतुदान विधि करावा.
वीर्यवर्धक व गर्भधारक विधि -- याप्रमाणे पहिल्या व दुसर्या महिन्यांतही प्रयोग करून गर्भ न राहील तर तिसर्या महिन्यांतील ऋतुकालाचे दिवसांत ज्या दिवशीं चंद्र ( चंद्र हा रस, रज व वीर्य यांची वृद्धी करणारा आहे ) पुष्यनक्षत्राला असेल त्या दिवशीं प्रात:काळीं प्रथम व्यालेल्या गाईचें ( प्रथम प्रसूता गाय तरुण असल्यामुळें अधिक गुणकारक असते ) दही घेऊन त्यांत भाजलेल्या सातूंच्या दाण्याचे पीठ दोन मासे मिसळून ते दही पतीनें पत्नीचें हातांत घालावें. नंतर पतीनें विचारावें “ किं पिबसि ” काय पित्येस ? या प्रकारे ३ वेळां प्रश्न करावा. नंतर पत्नीनें मानसिक प्रबल इच्छाशक्तीच्या योगाचें पुत्रच होणार अशी दृढ भावना धरून “ पुंसवनं ” असे त्रिवार म्हणून ( वीर्यवान् संतति होणे करितां हें पीत आहे असे तीन वेळा उत्तर देऊन ) तें दहीयुक्त यव ( सातू ) प्राशन करावें. याप्रमाणे ही प्रश्नोत्तरांची व दधिप्राशनाची क्रिया तीन वेळा केली असतां स्त्रियेची मानसिक शक्ति दृढ होऊन गर्भ राहतो. नंतर :-
वीर्यवर्धक व गर्भधारक नस्य -- द्यावे तें असें :- शंखपुष्पी ( सांखवेल ) व लक्ष्मणा ( पांढरीं रिंगणी ) या दोन औषधी पाण्यांत बारीक वाटून त्याचा २।३ मासे रस काढून फ़डक्यानें गाळलेला तो रस पतीनें पत्नीच्या उजवे नाकात पिळावा. त्यावेळी :- ॐ इयमोषधी त्रायमाणा हमाना सरस्वती । अस्या अहं बृहत्या: पुत्र: पितुरिव नाम जग्रभम् ॥ हा मंत्र म्हणून - ह्या औषधीपासून गर्भाचे रक्षण होऊन व सर्व दोष नाहीसे होऊन वीर्यवान् पुत्र व्हावा. अशी परमात्म्याची प्रार्थना करावी. नंतर यथोक्त ऋतुदान विधी करावा.
या दोन्हीं औषधीचें नस्य अपूर्व गुणकारी असल्यामुळे खात्रीनें संतति देणारे आहे. त्याचप्रमाणे मागील ( पुत्रेष्टि ) होमाचा धूर नासिकाद्वारानें मस्तकांत गेला असतां सामर्थ्यवान् संतति होते.
नाकाचा उजवा स्वर ( श्वास ) चालूं असतां संग केल्यास मुलगा होतो, डावा स्वर चालूं असतां संग केल्यास मुलगी आणि दोन्ही स्वर चालूं असतां संग केल्यास नपुंसक मूल किंवा वांझ मुलगी होते, म्हणून गर्भाधानापूर्वी प्रत्येक जोडप्यानें आपला कोणता स्वर चालतो, ते प्रथम अवश्यमेव पाहावें व आपल्याला पाहिजे तो स्वर चालूं करून संग करावा. डाव्या कुशीवर निजले असतां उजवा, उजव्या कुशीवर निजले असतां डावा स्वर चालतो.
गर्भाधानाच्या पूर्वी स्त्रियेनें ऋतुस्नात होतांच सूर्यदर्शन करून अशी भावना करावी कीं, माझें अपत्य अपूर्व गुणांनीं युक्त व सूर्यासारखे तेजस्वी व्हावे. म्हणजे नि:संशय तशीच महान् गुणयुक्त संतति होते.
हा प्रयोग करण्यापूर्वी उभयतांची प्रकृति सुदृढ असून स्त्रीचे गर्भस्थान निरोगी असावे तसेंच उभयतांची प्रबल इच्छा व प्रेम असून प्रयोग केला असता खात्रीने संतति होते.