पांचव्या वर्षी उत्तरायणसमयीं अक्षर लिहिण्याचा प्रारंभ करावा. ह्या अक्षरलेखनाविषयीं कुंभेचा सूर्य वर्ज्य करावा. शुक्लपक्ष शुभ होय. द्वितीया, तृतीया, पंचमी, दशमी, एकादशी, द्वादशी, आणि त्रयोदशी ह्या तिथी श्रेष्ठ होत. अश्विनी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, हस्त, चित्रा, स्वाती, अनुराधा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, रेवती हीं नक्षत्रें शुभ होत. मंगळ, शनि हे वार वर्ज्य करून अन्यवार शुभ होत.