संस्कार क्रम
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
१) गर्भाधान. २) पुंसवन. ३) सीमंतोन्नयन. ४) जातकर्म. ५) नामकर्मे. ६) निष्क्रमण. ७) अन्नप्राशन. ८) चौल. ९) उपनयन ( १० - ११ - १२ - १३ वेदव्रतचतुष्ट्य ४ ). १४) केशांत ( केशखंडन अथवा गोदान ). १५) समावर्तन. १६) विवाह याप्रमाणें सोळा संस्कार सांगितले आहेत. कित्येक ग्रंथकारांनीं अठ्ठेचाळीस संस्कार सांगितले आहेत. कित्येकांनीं पंचवीस संस्कार सांगितले आहेत. परंतु ग्रंथ - विस्तार - भयामुळें ते या ग्रंथात सांगितले नाहींत. आम्ही या ग्रंथांत मुख्य सोळा संस्कार सांगून आणखी अनवलोमन, सूर्यावलोकन, उपवेशन इत्यादि संस्कारही सांगितले आहेत. ह्या सर्व संस्कारामध्यें गर्भाधानापासून उपनयनापर्यतचे संस्कार सर्वांनीं नियमानेम केलेच पाहिजेत. परंतु स्नान इत्यादि तसे नाहींत म्हणून ब्रह्मचर्य आश्रमानंतरच संन्यास आश्रम घ्यावा अशा वचनास विरोध येत नाहीं.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP