संस्कारांचीं फले
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
गर्भाधान संस्कारापासून बीजसंबंधीं आणि गर्भसंबंधाचा दोष दूर होतो, तसेंच क्षेत्रशुद्धि होणें हें त्याचें फ़ल सांगितलें आहे. गर्भधारण झाल्यानंतर पुत्रोत्पत्ति होणें हें पुंसवन संस्काराचें फ़ल आहे. अनवलोभन संस्कारापासून गर्भाची स्थिरता होतें हे त्या संस्काराचें फ़ल आहे. सीमंतोन्नयन संस्काराचे फ़ल गर्भाधान संस्काराप्रमाणेंच आहे. जातकर्म संस्कारापासून गर्भासंबंधीं उदक प्राशनादिकांपासोन झालेला दोष नाहींसा होतो. नामकर्म संस्काराचें फ़ल आयुष्याची वृद्धि होणें आणि व्यवहार चालणें हे त्याचें फ़ल आहे. सूर्यावलोकन संस्कारापासून निश्चयेकरून आयुष्याची वृद्धि होते. निष्क्रमण संस्कारापासून आयुष्य संपत्ति ह्यांची वृद्धि सांगितली आहे. अन्नप्राशन संस्काराचें फ़ल मातुश्रीच्या गर्भामध्यें झालेल्या मलमूत्रादि भक्षणाचा दोष नाहींसा होतो. चौलसंस्काराचें फ़ल आयुष्य, बल, तेज यांची वृद्धि होणें हें सांगितलें आहे. उपनयन संस्काराचें फ़ल ब्राह्मणपणा येणें आणि वेदाच्या अधिकाराची सिद्धता होणें हें सांगितलें आहे. देव आणि पितर यांचें ऋणापासून दूर होणें हें विवाहसंस्काराचें फ़ल सांगितलें आहे. जेथें जेथें फ़ल सांगितलें नाहीं तेथें तेथें गर्म संबंधी पातक नाहीसें होणें हें त्याचें फ़ल समजावें.
गृह्यपरिशिष्टांत सांगितलें आहे -- गर्भाधानापासून विवाहापर्यंत जे अपत्य संस्कार त्यांना ऋद्धि असे म्हणतात आणि प्रतिष्ठा व उद्यापन ह्या कर्मांना पूर्त असे म्हणता. ऋद्धि म्हणजे समृद्दि. आपल्या संस्कारांना समृद्धि असे नांव आहे. आपणाला धान्य समृद्धि करावयाची असल्यास जमीन नांगरण्यापासून अतिशय दक्षता ठेवावी लागते. नाहीतर हानि होण्याचा संभव असतो. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष समृद्धीचे कारण जे अपत्याचे संस्कार ते काळजीनेंच केले पाहिजेत. नाहींतर संस्कारहीन अपत्ये स्वत:च्या कुलाच्या हानीला कारण होती. आश्वलायन म्हणतात -- संस्कार रहित द्विजांचा जन्म व्यर्थ होय.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP