श्रीपूजनादिशांति
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
यजमानानें आचमन करून हातांत पवित्र धारण करून प्राणायाम करावा. देशकालाचा उच्चार करून संकल्प करावा. तो असा :- या कुमाराच्या उपनयनामध्यें अथवा ( कन्येच्या विवाहामध्यें ) संस्कार करण्याचें वेळी मातेस रजोदोष प्राप्त झाल्यापासून उत्पन्न होणारें संपूर्ण अनिष्ट निवारण होऊन शुभफ़ल प्राप्ती व्हावी म्हणून श्रीपरमेश्वर संतुष्ट व्हावा याकरितां श्रीपूजनादि शांति करितो. प्रथम निर्विघ्न प्राप्त होण्याकरितां गणपतिपूजन व पुण्याहवाचन करितो. असा संकल्प करावा. त्याप्रमाणें ती करावीत. “ नंतर आचार्यवरण पंचगव्यविधि भूमीप्रोक्षण ” पृष्ठ ५७ ते ६० पर्यंतचे कर्म करावें. नंतर ईशान्य दिशेस रांगोळी वगैरेने अलंकृत केलेल्या जागेवर “ महीद्यौ० ” पृष्ठ ८ ओळ २० पासून पृष्ठ १० ओळ ८ पर्यंतचें कलशस्थापनेचे कर्म करावें. नंतर लक्ष्मीच्या सुवर्नप्रतिमेची प्राणप्रतिष्ठा पृष्ठ ६० ते ६२ पर्यंत अग्न्युत्तारणपूर्वक करावी. “ ॐ भूर्भुवस्व: श्रियैनम:श्रियं आवाहयामि ” या नाममंत्रांनीं व श्रीसूक्ताच्या १५ प्रत्येक मंत्रांनीं आवाहनादि षोडशोपचार पूजा करावी. नंतर स्थालीपाकतंत्र पृष्ठ ३३ प्यारा १ पासू पृष्ठ ४१ प्यारा १२ पर्यंत व पृष्ठ ४३ प्यारा १६ पासून पृष्ठ ४६ प्यारा २३ पर्यंत केल्यावर. हिरण्यवर्णा इत्यादि १५ मंत्रांनीं मंत्र व शेवटीं स्वाहा म्हणून १५ पायसांच्या आहुती द्याव्यांत. नंतर स्थालीपाकतंत्र पृष्ठ ४९ प्यारा ३२ पर्यंत करावा. नंतर स्थापन केलेल्या कलशांतील उदकानें श्रीसूक्त मंत्रांनीं यजमानावर अभिषेक करावा. आवाहित देवतांची ( लक्ष्मीची ) पंचोपचार पूजा करावी. आचार्याला गाय, दक्षणा, पीठदान द्यावें, विष्णुस्मरणपूर्वक केलेलें कर्म ईश्वरास अर्पण करून आचार्यास यथाशक्ति भूयास दक्षिणा देऊन त्यांचेकडून आशीर्वाद घ्यावेंत. या कर्मांच्या सांगतेकरिता १० किंवा ३ ब्राह्मण भोजन घालावें. अशा रितीनें श्रीपूजनाची शांति करावी.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP