प्रात:कालीन औपासनहोमाविषयी विशेष
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
प्रात:काळीं सूर्योदयापूर्वी संध्यावंदन करून अग्नि प्रज्वलित केल्यावर आचमन प्राणायाम करावा. प्रातरौपासन “ होमंकरिष्ये ” असा संकल्प करून होमाचेवेळी पूर्वींप्रमाणेच “ चत्वारिश्रृंगा० ” या मंत्रानें अग्नीचे ध्यान करावे. नंतर परिसमूहन, परिस्तरण, पर्युक्षण, दर्भकोलित फ़िरवून, बर्हिवर समिधेसह होमद्रव्य ठेवून कुंडाचे सभोवती अष्ट दिशेस गंधाक्षतांनी पूजा वगैरे पूर्वीप्रमाणेच करून ती समिध ( इध्मा ) कांहीं न बोलता अग्नींत द्यावी. नंतर पूर्वीप्रमाणेच तांदुळाची आहुति “ ॐ सूर्यायस्वाहा, सूर्यायइदंनमम ” ॐ प्रजापतयेस्वाहा प्रजापतयइदंनमम म्हणून द्यावी. पुन: परिसमूहन पर्युक्षण करून पूर्वीप्रमाणेच उभे राहून उपस्थान करावे. त्यावेळी “ सूर्योनोदिव० ” “ उदुत्यंजात० ” “ चित्रंदेवाना० ” “ नमोमित्रस्य० ” “ प्रजापते० ” “ हिरण्यगर्भ० ” हे मंत्र म्हणावेत. नंतर प्रातर्होंमास विशेषेकरून “ ॐ चमेस्वरश्चमे० ” या मंत्रानें अग्नीची प्रार्थना करावी. पूर्वीप्रमाणेच कर्म ईश्वरार्पंण करावें.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP