अन्नप्राशनाचा संस्कार
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
यजमानानें आचमन करून प्राणायाम करावा. देशकालाचें स्मरण करून माझ्या ह्या बालकाला मातेच्या गर्भांतील मलाचे प्राशनापासून झालेल्या दोषांचा नाश, शुद्ध अन्न इत्यादिकांची प्राप्ति, ब्रह्मवर्चस तेजाचा लाभ, इंद्रियें आणि आयु ह्यांची सिद्धि, बीजगर्भापासून झालेल्या पापाचें निरसनद्वारानें श्रीपरमेश्वराची प्रीति होण्याकरितां अन्नप्राशन नांवाचा संस्कार करीन असा संकल्प करून, त्याचें अंगभूत गणपतिपूजन, स्वस्तिवाचन आभ्युदयिक करून बालकाला अलंकृत करून पूजा आणि उपहार इत्यादिकांनीं इष्टदेवतेची पूजा करावी, त्या देवतेच्यापुढें आपल्या उजवीकडे शुभवस्त्रावर मातेच्या मांडीवर पूर्वेस तोंड करून बालकास प्रथम अन्नप्राशन करवावें.
दधि, मधु, तूप ह्यांनीं युक्त असें अन्न सोन्याच्या अथवा कांसाच्या पात्रात ठेवून “ अन्नपते० ” हा मंत्र बोलून सुवर्णयुक्त हातानें अन्न घेऊन पहिला घास खाववून मग पोटभर जेवण घालून मुख धुवून बालकाला पृथ्वीवर बसवून त्याच्यापुढें पुस्तक, शस्त्रें, वस्त्रें इत्यादि शिल्पसाधनें जीविकेचीं परीक्षा करण्याकरिता ठेवावींत. बालक आपल्या इच्छेनें ज्यास प्रथम स्पर्श करील तें त्याचें जीविकासाधन असें जाणावें. होम करण्याच्यापक्षी स्थालीपाक पृष्ठ ३३ पासून पृष्ठ४६ प्यारा २२ पर्यंत करून जातकर्माप्रमानें शुचि नामक अग्नीची स्थापना करून प्रधान होमाच्या शेवटीं अन्नप्राशन आणि जीविकापरीक्षण करावे. नंतर स्विष्टकृत् इत्यादि होमाचा शेष पुरा करावा; म्हणजे स्थालीपाक पृष्ठ ४९ प्यारा २८ पासून पृष्ठ ५३ प्यारा ३२ पर्यंत संपवावा. आपल्या शक्त्यनुसार ब्रह्मणांना भोजन देऊन दक्षिणा द्यावी. त्यांकडून आशीर्वाद घ्यावा. आपल्या बंधूंबरोबर स्वत: भोजन करावें. असा हा अन्नप्राशनाचा संस्कार संपला.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP