बालकाला दुष्टदृष्टि दोषादिक झाले असतां त्याचा रक्षाविधि
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
बालकाला कोणा दुष्टाची दृष्टी लागली असतां “ वासुदेवो० ” येथून “ शिशुं ” येथपर्यंत मंत्र म्हणत असतां भस्म अभिमंत्रित करून त्या भस्मेंकरून बालकाला भूषित करावें; व मस्तक, कपाळ इत्यादिक अवयवांना तें भस्म यथाविधि लावावें.
प्रयोगसार - “रक्षरक्ष० ” हा मंत्र भूर्जपत्रावर लिहून तें भूर्जपत्र बालकाचे बाहूवर बांधावें.
बालक रोदन करीत असेल तर त्याच्या परिहाराविषयीं - मयूखग्रंथांत यंत्र सांगितलें आहे तें असें सहा कोनाच्या आकृतीचें यंत्र काढून त्याच्या सहा कोनाचे मध्यांत ‘ र्हीं - हे मोठे अक्षर लिहून त्या र्हीं अक्षरामध्यें मुलाचें नांव लिहून सहा कोनामध्यें ॐ लु लु व स्वाहा ’ या मंत्रांची सहा अक्षरें ( दरएक कोनी एक अक्षर याप्रमाणें ) लिहून त्याच्या बाह्यप्रदेशी रथाच्या चाकाच्या प्रांतभागासारखी दोन वर्तुळें लिहून त्याच्या बाह्य प्रदेशीं सभोवती अधोमुख अशी अर्धचंद्रें काढावीत नंतर गंधादिक पांच उपचारांनीं यंत्राची पूजा करून बालकाच्या हाताला तें यंत्र बांधावें.
बालग्रहाची शांति इत्यादिक व बालग्रहाचीं स्तोत्रें इत्यादिक विधि शांतिकमलाकर, शांतिमयूख ह्या ग्रंथांत पहावेत.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP