आचार्यवर्ण
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
यजमानानें आपल्या अंगत्वे होमादि कार्य करण्यास आचार्यास वरतों असा संकल्प करून ब्राह्मणाची पूजा करावी. नंतर आपल्या प्रवराचा व गोत्राचा उच्चार करून अमुक नांवाचा मी, आचार्याच्या प्रवराचा व गोत्राचा उच्चार करून अमुक नावांच्या आचार्यास ह्या ग्रहयज्ञाच्या कार्याकरितां आपली योजना करितो असें म्हणून आचार्यास सुपारी द्यावी. " आचार्यस्तु० " या मंत्रानें प्रार्थना केल्यावर आचार्यानें म्हणावें आपण मला वरिले आहे, मी आपल्या बुद्धीप्रमाणें आपलें कर्म करीन. याप्रमाणें आणखी जे ब्रह्मा, ऋत्विज वगैरे असतील त्यांचें वरण करावें.
नंतर आचार्यानें आचमन प्राणायाम करून देशकालाचा उच्चार करावा. ग्रहयज्ञाकरितां यजमानानें वरिलेला मी आचार्य कर्म करितों असा संकल्प करून आसनविधि, पुरुषसोक्तन्यास व कलशपूजा करून कलशांतील पाण्यानें प्रोक्षण करावे. नंतर " यदत्रसं० " यानें पांढर्या मोहर्या चोहोकडें फ़ेंकाव्या.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP