वंध्यास्त्री पुत्रवती होण्याचा प्रयोग
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
१ ला -- लक्ष्मणा ( पांढरी रिंगणी ) हिला संस्कृतमध्यें गर्भदा असे एक नांव आहे. या पांढर्या रिंगणीची मुळीं व पाने पांढर्या गाईच्या दुधांत उगाळून ऋतुस्नात स्त्रियेने कांहीं महिनें नियमाने सेवन करून व नियमाने दूधभात भोजन केले असतां वांझेला सुद्धा गर्भ राहील. इतके या वनस्पतीचे महत्त्व आहे.
२ रा प्रयोग :- ऋतुकालीं वेळवांपासून निघणारे शुद्ध वंशलोचन ६ मासे घेऊन बारीक वस्त्रगाळ चूर्ण करून पांढर्या गाईच्या पावशेर दुधांतून १ तोळा खडी साखर घालून घेणे. याप्रमाणे ४ दिवस सेवन केल्यावर पतिपत्नीं संबंध करावा. पुढे गर्भधारणा नंतरही दररोज १ मासा वंशलोचन दूध साखरेबरोबर पूर्ण ९ महिनेपर्यंत घेणे म्हणजे पुत्र गौरवर्णी व दीर्घायुषी होईल.
३ रा प्रयोग :- जी स्त्री तपस्विनी राहून अग्नि, आयु, सूर्य व चंद्र यांची उपासना करील तसेंच वायूचे ( मोकळ्या हवेचे ) सेवन करील, स्वच्छ सूर्य प्रकाशांत काम करीत राहील व चंद्रप्रकाशांत बसेल उठेल, तिचे ठिकाणी वंध्यत्वाचा दोष राहणार नाहीं. म्हणजे ती पुत्रवती होईल.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP