मंडपदेवतांचें उत्थापन ( देवदेवक उठविणें )
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
तें मंडपदेवतांचें उत्थापन ज्या दिवशीं मंडपदेवतांचें स्थापन केलें असेल त्या दिवसापासून सम दिवशीं व पांचवा, सातवा ह्या दिवशीं करावें. तें शुभ होय. साहाव्या दिवशीं व विषम दिवशीं अशुभ होय. मंडपदेवकोत्थापनाचा प्रयोग विवाहप्रकरणांत दिला आहे तेथें पहावा. त्यांत विशेष संकल्प करणें तो “ उपनयनां०करिष्ये’ असा करावा. बाकी सर्व विधि विवाहप्रकरणीं देवकोत्थापन मंडपोद्वासनांत सांगितल्याप्रमाणें करावा.
सूत्रोक्तविचार - मंडपप्रतिष्ठा, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध याचा उल्लेख सूत्रकारांनीं केला नाहीं. ज्या निबंधादि ग्रंधकारांनी याचा विसृत उल्लेख केला आहे. त्या ग्रंथकारांनीं उपकारक म्हणूनच या कर्मांचा संग्रह केला आहे. ‘ सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित: ’ अंगोपांगाकरितां प्रधानकर्म टाकण्याची वेळ आली तर अंगोपांग कर्में टाकावी पण प्रधानकर्म टाकूं नयें; असेंच प्राचीन शास्त्रकारांचे मत आहे.
ज्योति:शास्त्रदृष्ट्या विचार - अनध्याय, कुयोग, जन्ममास, जन्मलग्न, जन्मस्थचंद्र शाखाधिपतीचे प्रातिकूल्य वगैरे उपनयनास वर्ज्य आहे, म्हणून विद्वान् ज्योति: शास्त्रज्ञाकडून उपनयनमुहूर्त पहावा. हा मुहूर्त गायत्री उपदेशाकरिता पहावयाचा असतो, पण सांप्रत मंगलाष्टकानंतरच्या निरीक्षणालाच मुहूर्त पाहातात. पत्रिकापूजन व घटिकापूजन यांची जरूरी नाहीं. ज्योतिषी यांचा सन्मान करावा.
मंगलाष्टक झाल्यानंतर पुरोहितानें, येयज्ञेन सूक्तांतील मंत्रांनी, बृहस्पते सूक्तांतील मंत्रांनीं व तदस्तु० ह्या मंत्रांनी बटूच्या व आचार्याच्या मस्तकावर हळदमिश्रित पिवळ्या अक्षतां टाकाव्या.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP