नवग्रहांची दानें
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
यजमानानें अग्नीच्या पश्चिमेस बसून उदङमुख असलेले आचार्य व ऋत्विज यांची पूजा करावी देशकालाचा उच्चार करावा. " ग्रहयज्ञस्य० " ग्रहयज्ञाची सिद्धि होण्याकरितां सूर्यग्रहाप्रीत्यर्थ ही कपिलागाय अमुक गोत्रांत उत्पन्न झालेल्या अमुक नांवाच्या आचार्यास दक्षिणेसहित देतो, ही माझी नाहीं असे म्हणून " कपिले० " हा मंत्र म्हणून आचार्यास गाय दान द्यावी. (१) त्याप्रमाणेच पुढें चंद्रास शंख (२) मंगळास बैल. (३) बुधास सुवर्ण. (४) गुरूस पिंवळें वस्त्र. (५) शुक्रास पांढरा घोडा. (६) शनीस काळी गाय. (७) राहूस लोहमय शस्त्रादि. (८) केतूस बोकड. (९) याप्रमाने नवग्रहांच्या उद्देशानें नऊ मंत्रांनीं नऊप्रकारचीं दाएं देऊन दक्षिणा द्यावी. देण्यास अशक्त असेल तर यथाशक्ति त्याबद्दल सर्वांच्या उद्देशानें गाय अथवा सुवर्ण द्यावें. शक्ति असेल अत्र शय्या, रत्न, भूमि वगैरे द्यावीत.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP