विवाहाच्या पूर्वीचें कृत्य व मंडापदेवताप्रतिष्ठादि
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
कन्येचे वडील व नवर्याचे वडील दोघांनीं विवाहाचे पहिल्या दिवशीं अथवा विवाहाचे दिवशींच संस्कार ज्यांना करावयाचा अर्थात् कन्या व नवरा ह्या दोघांबरोबर अभ्यंगस्नान ( मंगलस्नान ) केल्यावर सर्वांनी मंगलवेष धारण करून आपआपल्या मंडपामध्यें सडा संमार्जन करून त्यावर रांगोळी घालून वस्त्र घातलेल्या शुभासनावर पूर्वेस तोंड करून त्यावर रांगोळी घालून वस्त्र घातलेल्या शुभासनावर पूर्वेस तोंड करून बसावें आणि आपल्या उजवीकडे आपल्या पत्नीला आणि तिच्या उजवीकडे संस्कार्याला म्हणजे कन्येला आणि वराला बसवून आचमन करावें, प्राणायाम करावा आणि इष्टदेवतांना व वडिल माणसांना नमस्कार करून, देश व काल ह्यांचें संकीर्तन करावें.
कन्यापित्यानें ( कन्येचा विवाह असून पूर्वीचें संस्कार झालें नसतील तर ) माझ्या ह्या कन्येचे जातकर्म, सूर्यावलोकन, निष्क्रमण, उपवेशन, अन्नप्राशन चौल ह्या संस्कारांचा लोप झाल्याबद्दलच्या पापाच्या परिहाराकरितां प्रत्येक संस्काराबद्दल प्रत्याम्नाय गाईचे निष्क्रयभूत यथाशक्ति रजतमुद्रा दानानें मी करीन. ( जर गर्भाधान आणि सीमंत ह्यांचा लोप झाला असेल तर त्यांचाही उच्चार करावा. ) नंतर माझ्या ह्या कन्येस भर्त्याबरोबर धर्मयुक्त प्रजेचें उत्पादन, गृह्याग्नि स्वीकार आणि स्वधर्माचरणामध्यें अधिकार होण्याच्या सिद्धिद्वारानें.
वरपित्याचें - माझ्या ह्या अमुक नांवाच्या पुत्राला देवांचें आणि पितरांचे ऋणांतून मुक्त करण्यास कारणभूत अशी धर्मानें प्रजा उत्पन्न करण्याच्या सिद्धिद्वारा.
श्रीपरमेश्वराच्या प्रीतीकरितां विवाहसंस्कार नांवाचें कर्म करीन.
हा संकल्प झाल्यावर विवाहाचें अंगभूत असें गणपतिपूजन, स्वस्तिपुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध आणि ग्रहांची अनुकूलतां होण्याकरितां ग्रहयज्ञ, मंडपदेवताप्रतिष्ठा आणि कुलदेवतां ह्यांचें स्थापन व पूजन करीन, तैल आणि हरिद्रा ह्यांच्या देवतेचें पूजन करीन असा संकल्प करून त्या प्रमाणें ती सर्व करावी.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP