मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
ग्रहस्थापना

ग्रहस्थापना

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


स्थंडिलसंस्कार ( स्थालीपाकतंत्र पृष्ठ ३३ प्यारा १ पासून पृष्ठ ३६ प्यारा ५ पर्यंत ) करून अग्नि स्थापन करावा. नंतर ग्रहपीठावर वस्त्र घालून त्यावर गंधादिकानें मध्य कर्णिकेसहित अष्टदळ ( आठ पाकळ्यांचें कमळ ) काढून त्या पाकळींत पुढें सांगितलेल्या मंत्रांनीं ग्रहांचें स्थापन करावें. " प्रणवस्य० " तें " विनियोग: " येथपर्यंत म्हणावें.
ग्रहपीठाच्या मध्यभागीं वर्तुलाकृति मंडळ काढून रक्तपुष्पांक्षतांनीं " आकृष्णेन० " या मंत्रानें पूर्वमुख सूर्याचें आवाहन करावें. (१) नंतर आग्नेय दिशेस चतुष्कोणाकृति मंडळ काढून श्वेतपुष्पाक्षतांनीं पश्चिममुख चंद्राचें " आप्यायस्व० " या मंत्रानें आवाहन करावें. (२) दक्षिणदिशेस त्रिकोणाकृति मंडळावर रक्तपुष्पाक्षतांनीं दक्षिणमुख मंगळाचें " अग्निर्मूर्धा० " या मंत्रानें आवाहन करावें. (३) ईशान्य दिशेस बाणाकार मंडळावर पीतपुष्पाक्षतांनीं उत्तरमुख बुधाचें " उद्बुध्यध्वं० " या मंत्रानें आवाहन करावें. (४) उत्तरेस लांबट चौकोनी मंडळावर पीतपुष्पाक्षतांनीं उत्तरमुख बृहस्पतीचें " बृहस्पते० " या मंत्रानें आवाहन करावें. (५) पूर्वेस पंचकोणाकृति मंडळावरशुक्लपुष्पातांनीं पूर्वमुख शुक्राचें " शुक्र:शु० " या मंत्रानें आवाहन करावें. (६) पश्चिमेस धन्युष्याकृति मंडळावर कृष्णपुष्पाक्षतांनीं पश्चिममुख शनीचें " शमग्नि० " या मंत्रानें आवाहन करावें. (७) नैऋत्येस शूर्पाकृति मंडळावर कृष्णपुष्पाक्षतांनीं दक्षिणमुख राहूचें " कयानो० " या मंत्रानें आवाहन करावें. (८) वायव्येस ध्वजाकृति मंडळावर धूम्रपुष्पाक्षतांनी दक्षिणमुख केतूचें " केतुंकू० " या मंत्रानें आवाहन करावे. (९) या नवग्रहांचें आवाहन करण्यास सांगितल्याप्रमाणें फ़ुलें न मिळालीं आणि तितकें तांदूळ न मिळाल्यास यथाशक्ति जेवढें मिळतील तेवढ्या तांदुळांनीं व फ़ुलांनीं स्थापना करावी.
आतां अधिदेवता सांगतों -- " त्र्यंबकं० " या मंत्रानें सूर्याच्या उजव्या बाजूस रुद्राचें आवाहन करावें. (१) " गौरीर्मि० " या मंत्रानें चंद्राच्या दक्षिण बाजूस उमाचें आवाहन करावें. (२) " यदक्रंद० " या मंत्रानें मंगळाच्या दक्षिण बाजूस स्कंदाचें आवाहन करावें. (३) " विष्णोर्नु० " या मंत्रानें बुधाच्या दक्षिण बाजूस नारायणाचें आवाहन करावें. (४) " ब्रह्मज० " या मंत्रानें बृहस्पतीच्या दक्षिण बाजूस ब्रह्माचें आवाहन करावें. (५) " इंद्रंवो० " या मंत्रानें शुक्राच्या दक्षिणेस इंद्राचें आवाहन करावें. (६) " यमाय० " या मंत्रानें शनीच्या दक्षिणेस यमाचें आवाहन करावें. (७) " परंमृत्यो० " या मंत्रानें राहूच्या दक्षिणेस कालाचें आवाहन करावें. (८) " उषोवाजं० " या मंत्रानें केतुचे दक्षिणेस चित्रगुप्ताचें आवाहन करावें. (९)
नंतर " प्रत्यधिदेवतांचें स्थापन करावें. " अग्निंदूतं० " या मंत्रानें सूर्याचे डावेबाजूस अग्नीचें आवाहन करावें. (१) " अप्सुमे० " या मंत्रानें चंद्राचे उत्तरबाजूस आपांचें आवाहन करावें. (२) " स्योनापृ० " या मंत्रानें मंगळाच्या उत्तरेस भूमीचें आवाहन करावें. (३) " इदंविष्णु० " या मंत्रानें बुधाचे उत्तरेस विष्णूचें आवाहन करावें. (४) " इंद्रश्रेष्ठा० " या मंत्रानें बृहस्पतीचे डावेबाजूस इंद्राचें आवाहन करावें. (५) " इंद्राणीमा० " या मंत्रानें शुक्राच्या डावे बाजूस इंद्राणीचें आवाहन करावे. (६) " प्रजापते० " या मंत्राने शनीचे उत्तर बाजूस प्रजापतीचें आवाहन करावें. (७) " आयंगौ० " या मंत्रानें राहूचे उत्तरेस सर्पाचें आवाहन करावें. (८) " ब्रह्मणाते० " या मंत्रानें केतूच्या उत्तरबाजूस ब्रह्माचें आवाहन करावें.(९)
नंतर दक्षिणेकडून उत्तरेकडे अशा क्रमानें गणपति, दुर्गा, वायु, आकाश, अश्विनौ, क्षेत्र्पाल, वास्तोष्पति यांचे " गणानांत्वा० " (१) जातवेदसे०, (२) तववाय०, (३) आदित्प्रत्न०, (४)एषोउषा०, (५) क्षेत्रस्य०, (६) वास्तोष्पते०, (७) या मंत्रांनीं आवाहन करावें.
नंतर पूर्वादि अष्टदिशेस क्रमानें इंद्र, अग्नि, यम, निरृति वरुण, वायु, सोम, ईशान या अष्ट दिक्पाळांचें " इंद्रंवि०. (१)अग्निंदूतं०, (२) यमाय०, (३)मोषुण:०, (४) तत्वायामि०, (५) तववाय०, (६) सोमोधेनुं०, (७) तमेशानं० " (८) या मंत्रांनीं आवाहन करावें.
" तदस्तुमित्रा० गृहावै० " या मंत्रांनीं स्थापना करून त्या त्या मंत्रांनीं अथवा आदित्यायनम: इत्यादि नाममंत्रांनीं षोडशोपचार पूजा करावी.
नंतर ग्रहपीठाच्या ईशान्यबाजूस पुण्याहवाचनांत सांगितल्याप्रमाणें पृष्ठ ८ ओळ २० " महीद्यौ:० " येथपासून पृष्ठ १० वरुणपूजेपर्यंत म्हणून एकच कलश स्थापन करावा. त्या कलशाचें ठिकाणीं समुद्रनद्यांचें " सर्वेसमुद्रा:० " या श्लोकांनीं आवाहन करावे. " कलशस्यमुखे० " या मंत्रानें कलशाभिमंत्रण करावे. " देवदानव० " येथून " सर्वदा" येथपर्यंत म्हणून कलशाची प्रार्थना करावी.
नंतर आचार्यानें अन्वाधान करावें तें स्थालीपाक पृष्ठ ३७ प्यारा ६ प्रधानं, पर्यंत म्हणून प्रधानदेवतेचा उच्चार करावा तो - सूर्यादि नऊ ग्रह ह्या प्रधानदेवता आहेत, त्यांच्या उद्देशानें एकशेआठ अथवा अठ्ठावीस अर्कादि नऊ जातीच्या समिधांनीं व तितक्याच चरूच्या आणि तूपाच्या आहुतींनीं त्याप्रमाणेंच ईश्वर इत्यादि नऊ अधिदेंवता व अग्नि इत्यादि नऊ प्रधानदेवता त्यांच्या उद्देशानें अठ्ठावीस आहुतींनीं समिधांच्या आहुतींनी व तुपाच्या आहुतींनीं आणि चरुच्या आहुतींनीं होम करितों. *असा प्रधानदेवतेचा उच्चार केल्यावर पुन: स्थालीपाक पृष्ठ ३७ प्यारा ७ येथून आरंभ करून पृष्ठ ४१ प्यारा १२ पर्यंत करावा.
नंतर चरुश्रपणासाठीं ( होमाचा भात स्थंडिलावर शिजविण्यासाठी ) निर्वपण ( तांदूळ घेणें ) प्रत्येक ग्रहाच्या नांवाचा उच्चार चतुर्थी विभक्तियुक्त करून अर्थात् प्रत्येक ग्रहासाठीं चार चार मुठी तांदूळ घ्यावेत. स्थालीपाकांत त्याचा उच्चार करण्याची पद्धत श्चतुरश्चतुरोमुष्टीन्निर्वपतिअमुष्मै ( या शब्दाचें ठायीं " सूर्याय, सोमाय, मंगलाय इत्यादि ग्रहनामें उच्चारून ) " त्वाजुष्टंनिर्वपामि " याप्रमाणें चरु करावेत.
किंवा घरांत केलेला चरु ( भात ) घ्यावा. नंतर स्थालीपाक तंत्र पृष्ठ ४३ प्यारा १६ तत: पासून पृष्ठ ४६ प्यारा २३ येथपर्यंत करावें. त्यांतच सांगितल्याप्रमाणें आज्यसंस्काराबरोबरच गृहसिद्धान्न चरुचा संस्कार करून नवग्रहांच्या नऊ प्रकारच्या समिधा घ्याव्यात. नंतर यजमानानें अन्वाधानांत सांगितलेल्या संख्येचे अर्कादि समिधा, चरु व आज्य हें हविस्त्रय सूर्याकरितां, चंद्राकरितां आहे माझें नाहीं. याप्रमाणें नवग्रहांच्या व त्यांच्या अंगदेवतेच्या नावाचा उच्चार करून नवग्रहांच्या आहुतीचा व तदंगदेवतेच्या आहुतींचा त्याग करावा. याप्रमाणें त्याग केल्यावर ऋत्विज व आचार्य यांसह दहिमधानें भरविलेल्या अर्कादि समिधा. चरु व तूप या हविर्द्रव्यांनीं आवाहनांत सांगितलेल्या नवग्रहांच्या नऊ मंत्रांनीं व त्या त्या देवतेच्या मंत्रांनीं अग्वाधान संकल्पांत सांगितलेल्या संख्येइतक्या आहुति द्याव्यात. नंतर स्थलीपाकतंत्र पृष्ठ ४९ प्यारा २८ पासून प्यारा२९ पर्यंत करावें.
यजमानाकडून दिक्पालादिकांस सदीप - माषभक्त - बलीचा संकल्प करवावा.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP