मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
आडकाठी तुला जिवलगा रे केल...

लावणी - आडकाठी तुला जिवलगा रे केल...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


आडकाठी तुला जिवलगा रे केली कुणी ।

ये दिवसा नवर्‍यावाणी ॥ध्रु०॥

या शहर पुण्यामधी वाजुन चुकला डंका ।

नाही मुळीच धरली शंका ॥

फिर तुरा लाउन दाव दिमाख सगळ्या लोका ।

लुटविन तुझ्या हाते लंका ॥

अहो रात्रंदिवस पदरावर झेलुन थुंका ।

स्नेहसुखात शेवट जिंका ॥चाल॥

घडु नये गोष्ट ती सहज एकांती घडली रे ।

कोमळगात्रा ॥ कशि काय तेव्हा रे तुझी मजला मुरवत पडली रे ॥

जीवगेणी कठिण ही ममता कुणीकुन नडलि रे ॥चाल॥

आधी लहान होते त्य दिसात नवते शहाणी ।

नाकळे विषय अंथुरणी ॥१॥

लागले वेड प्रीतिच्या माझ्या भारी ।

नाही चित्त तुझे संसारी ॥

रहातोस उभा मुख झाकुन दोन्ही द्वारी ।

आली रात्र केवळ अंधारी ॥

घरी येउन मला निज घेउन नित शेजारी ।

काय करतिल दुसरी सारी ॥चाल॥

का उदास केलेस चित्त सांग बस खाली ।

नको रडु उगा डोळ्यांवर चढली लाली ॥

पहा पदर पुढे पसरुन गळी हात घाली रे ॥चाल॥

तुजसाठी प्राण खरचिन सोडिले पाणी ।

या करिन देहाची हानी ॥२॥

कृतनिश्चय माझा हाच आता या रंगे ।

सती निघेन तुझिया संगे ॥

वैराग्य घेउन जरी गेला दुसर्‍या जागे ।

तरी शोधित येइन मागे ॥

जिथे फिराल भिक्षा मागत आपल्या अंगे ।

तिथे झोळी पसरिन मागे ॥चाल॥

हातावर घेउन शिर निसंग जहाले रे ।

सोडुन जनाची लाज तुटुन घरी राहले ॥

मन निर्मळ गंगाजल तुझे पूर्विच पहाले ॥चाल॥

लागले तेव्हा पुन घ्यान फार निरवाणी ।

पहा दिसते केउलवाणी ॥३॥

हाती धरुन मला उभी करुन भरल्या हाटी ।

द्या चौघादेखत गाठी ॥ नाही जबरदस्ती कोणाची इष्कासाठी ।

मन मानेल घालिन पाठी ॥

जेऊ बसुन उन्हुन दुधभात एक्या ताटी ।

मारू मिठि उभयता कंठी ॥चालव

म्हणे गंगु हैबती धन्य स्त्रियांची करणी ।

करौजागरिणे जाउन आता ऋतुभरणी ॥

महादेव गुणी गुणिराज गोड गाई धरणि ॥चाल॥

पहा प्रभाकराचे छंद चुनदावाणी ।

रस भरुन अक्षर छाणी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP