मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
नको रे घालू घिरट्या दोहो ...

लावणी - नको रे घालू घिरट्या दोहो ...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


नको रे घालू घिरट्या दोहो द्वारी प्रहर प्रहरासी ।

पतीविण न घडे कधी संग मोठ्यारे अमिरासी ॥ध्रु०॥

बहुत श्रम केले म्हणुन पंचप्राण झुरतात ।

विषय गुज गोष्टी एक एक मनी रे मुरतात ॥

कीर्ति अपकीर्ति जगी मागे मात्र उरतात ॥

त्यात तुज पहाता नित सारेच कुरबुरतात ।

फिरुन मग जाता कुच माझे फुरफुरतात ॥चाल॥

वागते भिउनि घरी फारच श्वशुरदीराम्सी ।

उघड स्नेह कळता जाइल गोष्ट निकरासी ॥१॥

नकळे खरेखोटे हे शब्द चिकट चिल्हाळे ।

उठति ममतेचे ह्रदयात किरळ कोल्हाळे ॥

तुटुन जिव पडतो ऐकून सर्व पाल्हाळे ।

जपुन गडे येता जगी झालेच कूल बुलहाळे ॥

कुणापशी जावे फिर्याद वेल्हाळे ।

परस्पर घेतो स्नेह जळी स्मरून उल्हाळे ॥चाल॥

सलामत राखो श्रीहरी उभय शरिरांसी ।

गुप्त करा मौजा मग कोण धरिल पदरासी ॥२॥

मनांतून माझ्या तुसी वाटे प्रीत जोडावी ।

परंतु पतिची कशी शपथ सांग मोडावी ॥

घेउन पुढी नुस्ती सौखात विडी तोडावी ।

पाहुन कुच दुरुनी घटकेत त्वरित सोडावी ॥

येउन आज रात्री भ्रमाची मुठ फोडावी ।

नित्य डोळ्यावर कातडी कितिक ओढावी ॥चाल॥

तुला म्हणुन इतके नाही तर दुर्लभ इतरांसी ।

वचन मुळी गेले अरे सहज सगुण गुणराशी ॥३॥

धडा आज करुनी पर कामी शरीर भोगू दे ।

निजुन शेजारी वरकांती बसुन जागूदे ॥

कमर कमरेसी एकांती निवळ लागूदे ।

वस्त्र वर टाकुन सुख शयनी चाल भोगू दे ॥

म्हणे कवी गंगु हैबती संजोग जुगू दे ।

चतुर मोहर्‍याला चारी प्रहर पलंगी संगु दे ॥

महादेव गुणी ते राहतात पुणे शहरासी ।

प्रभाकर कविची नये करणी नविन सुगरासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP