मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
हसा बसा वरकांती बहुत भय म...

लावणी - हसा बसा वरकांती बहुत भय म...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


हसा बसा वरकांती बहुत भय मज ऐशा नारिला ।

गर्भ राहिल भोगिता तशामधी गेले प्रियकर स्वारिला ॥ध्रु०॥

नका निजू शेजारी, मी एव्हढी दृढ चरणी लागते ।

चार दिवस धीर धरा खुशालित, हेच अभय मागते ॥

सहज होत रत राहिल गर्भ एकदा म्हणुन उघडुन सांगते ।

विषय वेगळा करुन जसे, सांगाल तशी वागते ॥

इतर भोग उपभोग तुम्हा सवे, जवळ बसुन भोगते ।

अंतर न पडो मधी ह्याच सत्क्रियेस, नित जागते ॥चाल॥

का प्राण असा आटता । राज्यात अधीर वाटता ।

राहुराहून शरिरी दाटता ॥चाल॥

एकांतात गाठिता धरुन बळकट, करी शेलारिला ।

चुचकारुन मथविता जसे, हसवावे लहान पोरिला ॥१॥

असो भ्रताराआड लाड हे सर्व गोड प्रियकरा ।

आता होइल जनी हसे, अरे सख्या, शुद्ध ह्रदय भास्करा ॥

सकळ सुरुप मंडळीत माझ्या, स्वरुपाचा अस्करा ।

उभय कुळांकडे पाहुन करावे, बक्षिस रज किंकरा ॥

मुखचुंबन घेउन आनंदे, कुच कोमल कुसकरा ।

निरीस हात लावू नका, दुरुन तुम्ही विलास सारा करा ॥चाल॥

आड विहीर मला दोहोंकडे, राजसारे ।

दुस्मान उभे चहुकडे, राजसारे । धरतिल किरे रोकडे, राजसोर ॥चाल॥

सहज पडेल मग विपट अविट, ममतेच्या दिलदारिला ।

समजुन व्हा पलिकडे कसे करू, निसंग बळजोरिला ॥२॥

तर्‍हे तर्‍हेचा लाउन जिव्हाळा, शब्दामधे अडविता ।

अवघड जड जी जिवा गोष्ट ती, मज पासुन घडविता ॥

नकार करिता रुसुन उदासित, मुख तिकडे दडविता ।

ह्रदयी धरुन आवडिने विनोदे करी गिर्द्या बडविता ॥

घडित राग घटकेत लोभ, दाउन चौकुन बुडविता ।

मनी एक एक आठवुनी एकांती, नित्य मला रडविता ॥चाल॥

पसरुनी पदर विनविते । सर्वस्वी तुझी म्हणविते ।

स्नेह दिसंदिवस दुणविते ॥चाल॥

परोपरी पढविते तरि तुम्ही, निकर अंगिकारिला ।

अशी अवचित गवसले कुठे कधी, काय हरामखोरिला ॥३॥

फार दिवस लोतले हो, थोड्यासाठी अता छळू नका ।

नीट न्यहाळुन मजप्रती उगिच, सर्वांगी निजुन जळू नका ॥

नरम न्याहालिवर प्रेमरसे असे, अधीरपणे गळू नका ।

कळेल तेव्हा पुढे करा, तूर्त मीनकेतन खवळू नका ॥

दृष्ट भरुन पहा दुरुन बसाया कडी उघडुन पळू नका ॥

किंचित पडल्या चुकी, पूर्व वचनास, सख्या, चळू नका ॥चाल॥

घडोघडी पसरिते पदर । अडचणीवर ठेवा नदर ॥

का कठिण करता कदर ॥

सदर धरुन करी कवन गंगु हैबती, आणी रंग बहारिला,

महादु प्रभाकर म्हणे सख्या कर शांत आता गोरिला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP