मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
पहिल्या हो नहाणाची । हळु ...

लावणी - पहिल्या हो नहाणाची । हळु ...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


पहिल्या हो नहाणाची । हळु हळू तरि करा विषय, मी नव्हे नार गहाणाची ॥ध्रु०॥

मउ मउ फूल मखमूल । तसे शरिर गुलगुलित सुगंधिक जसे गुलाबी फूल ॥

स्तन करती दुलदूल । मलाच माझे स्वरुप पहावेना उगीच पडते भूल ॥

किति कमरेत दावू हूल ।

पलंगी उद्यापसुन लागेल करावी एकीकडे वर चूल ॥चाल॥

अशी निजाची चाल पुण्यामधे नसेल कोणाची ॥२॥

चोळी चिरली दंडी (हाय रे) ।

त्यात तुम्ही आज नहुन घातली अंगात रूबंडी ॥

इतुकी असुन थंडी (पुसाची) ।

जड झाले पातळ कुसुंबी नाही सांगत कंडी ॥

चिकाटी लोखंडी, (तुमची) ।

असा पुरुष नित ती एक भोगिल जिवट असेल रंडी ॥चाल॥

नका नका, दुर बसा, घेतली खबर ठिकाणाची ॥२॥

बहुत अवघडल्ये, (एकांती) ।

कळते असे जर अधिच तरी मी नसत्ये वर चढल्ये ॥

अवचित सापडल्ये, (बिच्छोनी)।

अता वृथा बळ करुन अशासनी जडु नये दृढ जडल्ये ॥

मीच खाली पडल्ये (सुखाने) ।

नका असा दम एव्हाच मारू केव्हाची बडल्ये ॥चाल॥

करा काही काळजी जिवलगा माझे हो प्राणाची ॥३॥

तुम्ही तरी आनंदी, (खिलाडी) ।

आसनातुन का अजुन उठाना नाही तिळभर मंदी ॥

केलि कैफान बंदी, (वडिच्या) ।

धुंद नेत्र पहा घाइत गळ्यामधे आले पागोटे कंदी ॥

गंगु हैबती फंदी, (पुण्याचे) ।

महादेव गुणिराज गुरूचे त्रिकाळ पदवंदी ॥चाल॥

प्रभाकरांची अधिक हातोटी अक्षर छाणाची ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP