वळखिले पाउल प्रारंभी दिल्या वचनास कसे टळला ॥ध्रु०॥
कुणी जुलुम केला रे कधी खुशीचा आधी करुन सवदा ।
घेतला बहार कसकसून, अगोदरपसुण, उमर चवदा ॥
दाविले दःखाचे दिवस, वृथा गेले नवस, सख्या रे अवंदा ॥चाल॥
मी कुळवंताची स्त्रिया । सोडली अजुन नाही क्रिया ॥
हवे जवळ सदोदित प्रिया ॥चाल॥
भावार्थ जोडिला रे स्नेहसुखावीण देह निपट गळला ॥१॥
लाविला जिव्हारी बाण, घेउन सती-वाण, प्राण देते ।
सोडिले दौलतीस पाणी, जिवा हो हानि, कोण भीते ॥
दूर तुझे असुनीया सदन, मदे अधोवदन, होउन येते ॥चाल॥
कामाची न सोसे अगन ।
लाव मुहुर्त पाहुन लगन ॥
मन फिदा तू खाली तगन ॥चाल॥
धन वेचिन खेळुन जुवा चला घेउन मदन चळला ॥२॥
गळी पडुन धरिले रे पाय, कशी हाय हाय, गाय फसली ।
घालिते विडा वदनात, दुजी सदनात, असेल बसली ॥
म्हणुनी तुम्ही प्रियकरा, करितसा त्वरा मला दिसली ॥चाल॥
रसरसली नवती नुतन ।
तुजकरिता केली जतन ॥
त्यागिता करिन जिव घतन ॥चाल॥
सोडिले सैल पहिल्याने आता अनुभव मज कळला ॥३॥
काय कमी तुला रे संपत्तीस मी वचनाचि तुझ्या विकली ।
मजपासुन, तुल रे आलि दिसुन, केव्हा तरी काय गोष्ट चुकली ॥
मुखजडा बोल काही गोड चला मंदिरा शेज सुकली ॥चाल॥
गंगु हैबती म्हणे सुंदरी । ने समजावुन मंदिरी । करी विलास बहु आदरी ॥चाल॥
महादेव प्रभाकर हवा, जव्याशी जवा, शिरा मिळाला ॥४॥