मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
पतिव्रता व्रत कठिण आरंभुन...

लावणी - पतिव्रता व्रत कठिण आरंभुन...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


पतिव्रता व्रत कठिण आरंभुन, शरिर सदोदित आटिवले ।

बहुत न घडता संग करुन व्रत-भंग नाहक मज बाटविले ॥ध्रु०॥

स्वरुपवान गुणी तरुण स्वता, शूर भ्रतार माझा सरदार ।

पुण्य परायण परोपकारी, पिढीजाद जहागिरदार ॥

सावकारित पत फार प्रतिष्ठित, शहर पुण्यामधी घरदार ।

कितीक लोक आश्चर्य विलोकुन, सहज दिपती मुढ मुरदार ॥

अतिशय मजवर लोभ मनातुन, आवद हवा उर भरदार ।

घडिभर बाहेर चैन पडेना, मलाह नलगे परदार ॥चाल॥

असे असुन पहा उदार चित्ते, नेहमी तुला आखुन ठिवले ॥१॥

महिन्यातुन तिनवार अबोला, बरा अससी एक आठवडा ।

उगिच गाल फुगवून रुसवे, आला दिवस उपरदवडा ॥

पर पुरुषा रे विटाळ नवता, कसा करुन तरी बाटवडा ।

मन माझे मोहिलेस नकळे, आहे तुझ्यापशी मनकवडा ॥

उर उघडा घडोघडी करुन कुच, दाखविता तुज ताठवडा ।

दुर दुर जासी निघुन बघुन लगबगुन होसि का कानवडा ॥चाल॥

एवढ्यासाठी प्रथम फसविले, अखेर सख्याते नाठविले ॥२॥

तुझा सुखाचा शब्द पुरे, नको आतृप्त जेवण इतरांचे ।

चतुराला देहे हजर, गव्हारा अयोग्य पदरच पसराचे ॥

जंवर कुडिमधी प्राण तवर, नाही अजुन तुम्हाला विसराचे ।

शेवटास स्नेह लावुन मजला, नाव राखणे पितराचे ॥

कठिण दुरोत्तर करीन पुढे जर, शब्द न मानुन निकराचे ।

गंधमादनापरी तरि मुख, दुर्गंधी सकल होउ डुकराचे ॥चाल॥

कराराचे दिले अभय वचन जे, आजवर मनी ते साठिवले ॥३॥

एकादशी शिवरात्र चतुर्थी, प्रदोष करता अंतरले ।

म्हणून प्राणी नरकांत बुडाले, असे समुच्चय कुठे ठरले ॥

पतिव्रताव्रत कठिण तयाहुन, स्वधर्म सगळेच आचरले ।

अधर्म एक पहा कुकर्म घडता, कितीक दोष शास्त्री धरले ॥

कळुन असे धडधडीत तुझ्यावर, पंचप्राण माझे फिरले ।

दहा दहा वेळ भर भोग खुशालित सहज मनोरथ मग पुरले ॥चा॥

महादेव गुणीराज म्हणे चिद्रत्‍न सखीला भेटविले ।

प्रभाकराचे कवन सुलाखुन सरस्वतीने पाठविले ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP