मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
जिवलग गेले प्रवासी । घोर...

लावणी - जिवलग गेले प्रवासी । घोर...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


जिवलग गेले प्रवासी । घोर लावुन जिवासी ॥धृ०॥

पतिविण पडले वनात । ह्या दुष्ट जनात ॥

एक एक येते मनात । झाले दीन दीनात ॥

दचकुन उठे स्वप्नात । सुंदर सदनात ॥

कसे करू तरी दैवासी ॥१॥

गेले गुंतुन मोहपाशी । काय जाळू रुपासी ॥

नकळे बसले तपाशी । नित राहुन उपाशी ॥

पाहु ज्ञानदीपासी । स्थळ नाही पासी ॥

तिकडिल मुलुख मवासी ॥२॥

आले मधुर वृक्ष पिकासी । कळवारे शुकासी ॥

निर्मळ चंद्र आकाशी । तसे स्वरुप प्रकाशी ॥

टाकुन गेले मोकाशी । पहा नाशिक काशी ॥

कुठवर विनवू शिवाशी ॥३॥

प्रियकर वैद्य मिळाला । मद रोग नायनाट केला ॥

मिळले जीवन जळाला । त्वरे शोक पळाला ॥

गंगु हैबती सहलाला । वाणिती सत्कुलाला ॥

चहाती महादेवासी । गुणी प्रभाकरासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP