मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
काय चुकी मजपासुन महाराज घ...

लावणी - काय चुकी मजपासुन महाराज घ...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


काय चुकी मजपासुन महाराज घडली ॥ध्रु०॥

श्रीमंत तुम्ही मुख्य राय ।

वंदितात कितिक पाय ॥

कठिण मला दिवस जाय ।

फार फार केले उपाय ॥

सकळ झाले निरुपाय ।

दैव उणे म्हणुन काय ॥

मर्जी बिघडली ॥१॥

कृपादृष्टिने हो दुरून ।

पाहिल्यास नेत्र भरभरून ॥

अमर होइन दुःख हरून ।

भाग्य उदय त्यात फिरून ॥

सरस समयि शांति धरून ।

आज हातास मूर्ति स्थिरून ॥

सहजात चढली ॥२॥

पाहुन व्यर्थ विप्रकूल ।

आणिक भीष्म जननिमूळ ॥

तसेमाझे गुण गढूळ ।

माफ करुन पायधूळ ॥

झाडिताच आधी विपूळ ।

वहाति वेळ बरी समूळ ॥

पहिल्यापुन उघडली ॥३॥

निशिदिनी मनी ध्यानस्मरण ।

भजनपुजन सर्व चरण ॥

महादेव म्हणे हेच तरण ।

यशवंत सौख्यभरण ॥

प्रभाकर लउन शरण ।

तोड जोड गोड धरण ॥

माशुक घडली ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP