मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
रुंद छातिवर बूंद गेंद जणू...

लावणी - रुंद छातिवर बूंद गेंद जणू...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


रुंद छातिवर बूंद गेंद जणू गुलाब बहारा मधी फुलती ।

वसंतकाळी कळे कोवळे तसे ग तुझे जीवन खुलती ॥धृ०॥

श्रवणफुले श्रवणात अमोलिक स्वच्छ हिर्‍यांची झळझळती ।

चंद्र बिजेचा जसा तशा ग तव मुक्त लडा बाजुस रुळती ॥

सरळ केश चोचीत मिन्याचे, मयूर फाशांमधी मिळती ।

वेणि विलोकून सर्प भयभित, होउन वनांतरी किति पळती ॥

बाळ्या बुगड्या घोस पाचुचे पाहुन वनी भुंगे पळती ।

शुद्ध घाट राखडीसभवते, मंगळ भृगू बसले न कळती ॥

सुरांगना रूप पाहुन वरत्या, इंद्र सभेसी हळहळती ॥चाल॥

नेत्र बघुन ते इंदुरथींचे कुरंग सहसाही न चलती ॥१॥

रक्त टिळा रेखांकित भाळी शामशून्य शोभित वर्णे ।

भवयधनुष्यामधी रेखिली स्वस्थपणे सोपसकर्णे ॥

मंद मंद मुखी बिंदु चमकती घर्म नव्हे भास्कर किर्णै ।

चंद्रहार गळी भुजंग पाहुन धाव घेतली सौपर्णे ।

चार अंगुळे चौकि पाचुची तनमणि नटला चुणी भर्णे ।

अलाफ नलगे सहज बोलता येती दुरुन धावत हर्णे ॥चाल॥

शरण अवंतर स्त्रिया सुरुप ज्या नेहमी हिंदुळ्यावर झुलती ॥२॥

निकोप गाभा सरळ कर्दळी हस्त तसे नाजुक दिसले ।

अधर लाल लवथवीत नौतिच्या रंगरसामधी रसरसले ॥

संगीन कुच भरदार सजिव सजदार गुलगेंद उसासले ।

श्रमी भोक्ता होइल म्हणुन हे विसाव्याचे वाडे बसले ॥

येउन रावे नासाग्र पहावया घोर अरण्यातुन फसले ।

दंड पाहुन गोंडाळ हस्ती गंडस्थळी धुळ घालुन बसले ॥चाल॥

स्वरूप किर्ति ऐकून घरोघर पुरुष भुजंगापरि डुलती ॥३॥

त्रिकाळ ज्याणे उमामहेश्वर अनुक्रमाने आधी पुजली ।

फळास तप ते आले ये जन्मी अंकी बसुन स्वरुपे सजली ।

सफेत पातळ सिंहकटीवर खुब शोभतसे तिनमजली ।

पदर वरुन आत किंचित भासे शर्मे उराची खुण बुजली ॥

आजन्मात किती परस्त्री मातेसमान त्यांची वृत्ति रिझली ।

संग घडो यान घडो घरासी दर्शनास दुनिया धजली ॥चाल॥

उदक हातावर केल्या तपाचे घालावया ते किती भुलती ।

महादु प्रभाकर म्हणे अचंबा धन्य विधात्याची क्लुप्ती ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP