मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
प्रियकरावाचुनि गे गेली सा...

लावणी - प्रियकरावाचुनि गे गेली सा...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


प्रियकरावाचुनि गे गेली सारी रात्र बाई ॥ध्रु०॥

कुठवर वाट सखे मज सांग काही ।

घडोघडी याद होते गृही पतिराज ॥

कसे करु प्राण जाता असा निष्ठुर पाही ।

पाहु कोठे कोणे ॥१॥

हवाशिर चांदण्याचा प्रियकर माघ महिना ।

खुशाल घातला ग अंगावर फार गहिना ॥

पहा मुखचंद्र माझा प्रकाशाचा थेट ऐना ।

जसी सुकुमार जाई ॥२॥

कोणी तरी शोध घेऊन सखा एकांतात गाठा ।

परोपरी आर्जउनी उचलुन घ्या ग ॥

मनातिल सर्व काढा उपडुनि किंतु काटा ।

ठिवा डोई ग पायी ॥३॥

म्हणे गंगु हैबती हो अशी कशी प्रीत तुमची ।

महादेव ख्याल करती विलायत थेट कमची ॥

म्हणे गुणीराज काहि तरी गोष्ट आमची ।

प्रभाकर ख्याल गाई ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP