मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
वैर्‍याचे दिवस लोटती । का...

लावणी - वैर्‍याचे दिवस लोटती । का...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


वैर्‍याचे दिवस लोटती । का मरण नये मजप्रती ।

अता कधी प्राणसखे भेटती ॥धृ०॥

मेणकरा आरसा सख्यांनो गुलाल भांगी नका भरू ।

वेणिफणी राहु द्या बोर आणि चंद्रकोर हता धरू ॥

येई लोट आवरेना कधिग ते दृष्टि पडेल तरी पाखरू ॥चाल॥

हौसेने महाल बांधिला । नाही काही दिवस लाधला ॥

वेळ पाहुन वैर साधिला ॥चाल॥

आला चैत्र मास दारुन उन्हाळा वृक्ष वनी फुलती ॥१॥

उष्ण कधिग पाहिले तयाने ? दूर पाठविले तरी कुणी ।

नको दिपू विनविते दुपारी ऐस ढगामधी चूडामणी ॥

शरिर फार सकुमार देखना लक्ष श्रीमंतामधी गुणी ॥चाल॥

वरुणा तू वनामधी खपुन । ठाई ठाई जले ठिव जपुन ।

श्रीहरी जातने आपुण ॥चाल॥

सांभाळ करा स्वामिंचा पदोपदी गहिवर मज दाटती ॥२॥

फार कठिण परदेश परावा अल्प वयामधी स्वारी करून ।

नको म्हणत असता निघाले नाही पाहिलेग मागे फिरून ॥

निष्ठुर मन बाई पहाग तयाचे धाई धाई रडते पोट धरून ॥चाल॥

घेऊन मांडिवर उसे ।

वनवासी टाकिले कसे ॥ नळे दमयंतीला जसे ॥चाल॥

आज काणी नव्हे आपले तुझ्याविण शत्रू शरीर आटती ॥३॥

काय करू श्रृंगार हिर्‍यांचे विंचू फणाणुन झोंबती ।

चंद्रहार तन्मणी गळ्यामधी सर्प सुळसुळीत लोंबती ॥

छडीदार पातळे बुट्यांची अमोल परि ती न शोभती ॥चाल॥

आणा प्राणसखा जाऊनी ।

द्या धर्म तडीस लाउनी ॥ फळ नाही प्राण ठेउनी ॥चाल॥

बूट महादू प्रभाकर करी रसिक गुणी गंगाधर वाटती ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP