मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
धुंद तुम्ही विषयांत लागली...

लावणी - धुंद तुम्ही विषयांत लागली...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


धुंद तुम्ही विषयांत लागली कळ माझे पाठिशी ।

गत करू सख्या मी कशी ॥ध्रु०॥

पुरुष तुम्ही बेमान भान किहो नाही तुम्हा मागले ।

हळु म्हणता करता बळे ॥

कळ साहिना वेळ लोटते मोजुन घटका पळे ।

हे शरिर सख्या कोवळे ॥

नवेच नसले होते राजसा आज पातळ पीवळे ।

गेले तडकुन घसर्‍यामुळे ॥चाल॥

देह बहुत त्रासला । तुम्ही तर फारच उल्हासला ॥

एव्हा मज वैरि कसे भासला ॥ मेळ ॥ जरा वळू द्या कुशी ॥१॥

सोडा कवेतुन मला, घेउ द्या जरा विसावा तरी ।

मज उठवुन बसवा तरी ॥

कोठे पळत नाही, नका आणु तुम्ही संशय ह्रदयातरी ।

मनी धीर धरा क्षणभरी ॥

सैल करा आधी जरा खवाटे, खुपती मानेला सरी ।

तडकली चोळी भरजरी ॥चाल॥

जिव झाला घाबरा ।

आधी तुम्ही विचार पुरता करा ॥

येउ द्या द्रव मनाला जरा ॥ मेळ ॥

काढा खालुन उशी ॥२॥

कोठुन गवसल्ये प्राणविसाव्या अवचित तुमच्या करी ।

नाही वाचत सख्या खरी ॥

प्रीति ठिकाणी नाही तुमची झाली आज बावरी ।

कसे करू राजसा तरी ।

घर्म दाटला बहुत सख्या मी झाले आज घाबरी ।

नाही मजल आता यावरी ॥चाल॥

निर्दय झाला कसे । देहाचे भान तुम्हाला नसे ॥

लागले कसे वल्लभा पिसे ॥मेळ॥

बोला क्षणभर मसी ॥३॥

हळुच करा प्रियकरा, साहिना भार, वरुन उतरा ।

मुखे विनोद नुस्ता करा ॥

एक वेळ नव्हे दोन वेळ वेळ हे तिसर्‍याने प्रियकरा ।

मनी विचार काही धरा ॥

जरा होउ द्या हुशार मजला विषय तुम्ही मर्सी पुरा ।

मग चित्ता अगोचर करा ॥चाल॥

म्हणे प्रभाकर चढी ।

नको लागुन तोडू गडी ॥

स्त्री एक सोड येव्हांची घडी ॥मेळ॥

तिची पाहुन खुशी । मग धरा एकादे दिशी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP