कुलस्वामिनी दुर्गां माता, सिंहारूढ बसली । मला ती जगदंबा दिसली ॥धृ॥
सांब शिवाची आदिशक्ती । माया म्हणुनी जीव घाबरती । गुरुकृपेने कळली मला ती । माय माझी माऊली ॥१॥
गोडी वाचून गुळ असेना । शक्ति विना तो शिव दिसेना । शिव शक्तीचे मीलन एकची, खूण मला पटली ॥२॥
शुंभ निशुंभा मर्दन करीते । निज भक्तासी थारा देते । रामचंद्र कृपेने राधिकेच्या, हृदयी ती ठसली ॥३॥