एकतारी संगे एक रूप झालो । आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो ॥धृ॥
गळामाळ शोभे आत्मरूप शांती, भक्ती भाव दोन्ही धरू टाळ हाती । टिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो ॥१॥
भुकभाकरीची छाया झोपडीची निवार्यास द्यावी उब गोदडीची । माया मोह सारे उगाळूनी प्यालो ॥२॥
पुर्वपुण्य ज्याचे मिळे सुख प्याला । कुणी राव होई कुणी रंक झाला । मागणे न काही सांगण्यास आलो ॥ आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो ॥३॥