मज सांग तू काय जाहले, टप टप जल बिंदू का पडले, तुझा भाऊ पुसतो ज्ञानोबा तुला, माझ्या मुक्ताला कोणी मारले ॥धृ॥
दादा तुला रे आवडले मांडे, भाजायला हवा होता तवा, म्हणूनी गावामध्ये मी चालले, येसू काका तेवढ्यामध्ये वाटेत भेटले, कोठे चाललीस कार्टे विचारले माझ्या गालात जोरात मारले ॥१॥
आई कशाला गेलीस कोठे, सोडूनी आम्हा देवाघरी, तीने जाताना मज कुरवाळीले, देह पाषाण हृदयी बनले, विटेवरी विठ्ठल गहिवरले ॥२॥
बोले माऊली रडू नको मुक्ता देतो तुला तापवूनी तवा, जठराजाला हुकूम केला, जठ अग्नी धावूनी आला घेई पाठीवर भाजूनी मांडे, विटेवरी विठ्ठल डोलू लागले ॥३॥
एका जनार्दनी म्हणे वाणी, चार भावंडाची सत्य ही कहाणी, भिंत मातीची ऐसी हो चाले, वेद रेड्यामुखी ऐसे बोलले, चांगदेवाने हात कैसे जोडले, देव मुक्ताच्या हृदयात धावले ॥४॥