हरी किर्तन रंगी रंगाया, ये नाचत ये रे गणराया ॥धृ॥
प्रारंभी तुज आव्हाहिन, मी मनोमनो तुज पुजीन, कर जोडुनिया विनवित, कर जोडूनिया विनवीत, येई पायी पैंजण बांधुनिया ॥१॥
अंगी शोभे शेंदुराची उटी, वरी केशर कस्तुरी लल्लाटी, मुक्तमाळ शोभे कंठी मुक्त माळ शोभे कठी, रत्नजडित किरिट शिरी घालुनिया ॥२॥
या सात स्वरांच्या संगीता, मम भाव फुलानी सजविता, जिवे भावे मी आळविता, जीवे भावे मी आळविता । मजवरी कृपेची करी छाया ॥३॥