हरी नाम माया उत्तम पूर्वी भक्षिले महादेवानी । यांच्या विषाच्या बाधा गेली नीलकंठ म्हणू लागले सारेजण । सनक संकजी सनतकुमार सनतनंदन । असे बोध सुधारस पाजूनी आघात केले त्यांनी । दत्तात्रय महाराजाने घेतले चोवीस गुण । असे अनुभव सैन्य गुरुला उपकार मानले यदुरायाने । नारदाने वाल्मीकीला रामनाम गोळ्या दिल्या दोन । ह्यांच्या औषधाने बिभिषण प्रल्हाद बरे झाले फार फार जण । जनक राजा सुखवामदेव नऊजण नारायण । वसुदेव देवकी परिक्षितीनी घ्या मात्रा अंबऋषी । गज आणि गणिका आणिक ऐका अजामेल ब्राह्मण । ब्राह्मण विप्र वशिष्ठमुनि कपीलमुनी जडी व्रतासी आले गुण । उद्धव अर्जुन अमर झाले वेदाचे चक्रपाणी । दुर्योधन राजा औषध घेईना गेला मरूनी ॥ वैद्यराजे निर्गुणपुरीचे औषध घ्या हो कुणी घ्या हरीनामाची मात्रा मात्रा घटका जाते सुनी ॥धृ॥१॥
चौर्यांशी मरमर मोठी गटांगण चुकणार नाही कोणाला । दहालक्ष अंड्याची खाणच पण जाती पक्षाच्या योनीला वीस लक्ष झाड झडूला तेथे मौज गवताला तीस लक्ष चौपायांचे नवलक्ष जळचरा । अकरालक्ष इजबीज किटक चार लक्ष मानवाला असे तो भाषण हे मुखीचे कोण म्हणेल हो त्याला । साडेबारा वर्षाचा अज्ञान बालपण खेळताच दिवस गेला । साडेबारा वर्षाच्या उपर मग तो भर पंचवीशीत आला । देणे घेणे लग्न मुहूर्त रोजगार करू लागला । असे ते पण गेले पुढे शंभर आले भरतीला । उपास पारणे दुखणे भाने जेवलास काय समजेना । असे तप्त म्हसोबा गुरुचे वाक्य नाही ऐकले हो त्याने । असे हा नरदेह व्यर्थ गमविला हो त्याने । असे साधुचे भाषण ऐकूण भागवत सांगितले देवाने ॥२॥
रामकृष्ण मुखीचे औषध । मोलच काय लागेना । येता संकट वाटे नरदेह जाईल का राहीना । धन, सूत, जाया लटकीच माया ह्याला व्यर्थच खर्च भाषण । हरीनारायण हरी नारायण हरीनारायण घ्या केव्हा मान अभिमान धरू नको ह्याच्या डोळ्यात नवसायेना ह्याचें नाव घेता व्यतिपात भद्रा वेळ घटका सुमुहुर्तच काही लागेना । करा पसंती ह्याची ह्याची पत कहो राखेना । वैराग्य भगवा वाण्याची वासना नासना ॥३॥
प्रपंच जागला परमार्थ निजला लज्जाच नाही राव याला । नको तरी देवा घालू जन्मा सोडवी आता तरी मला देवकृपेचा सागर गुरु यानी बंद खुलासा केला । सोमशब्द विसरूनी मग तो क्यांव क्यांव रडू लागला, एक दिवस होता । कधी दोन दिवस होता कधी पांचवीला कंठ फुटला नऊ महिने आईच्या पोटी बेजार बेजार झाला । महिन्याचा होता कधी दोन दिवस होता कधी साठ वर्षात मेला । वाघाने खाल्ला । सर्पाने डंवसला । भिंती खाली दडविला । परी वडिलच होऊनी आला योगी झाला कधी जोगी झाला कधी बादशहा झाला कधी बिरबल झाला कधी । हात पसरी लोकाला । श्रीवैद्यच गुरू नाही केला । कोटी कोटी यांनी कोटी कोटी जागा छपन्न देश हिंडला । श्रीवैद्यच गुरू नाही केला नामदेव ऐका कबीर तुका वैद्याचे आज गुरुधनी करा पसंती परघर उपकार निर्मल केले ह्यांनी ॥४॥